निती आयोग
अटल इनोव्हेशन मिशनने ‘बदल घडवणारे अनुकरणीय मार्गदर्शक’ हा उपक्रम साजरा करण्यासाठी मेंटर इंडिया गोलमेज परिषदेचे आयोजन केले
Posted On:
09 NOV 2022 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2022
नीती आयोगा अंतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशनने आज बदल घडवून आणणाऱ्या 35 वेगवेगळ्या अनुकरणीय व्यक्तींच्या योगदानाचा आढावा घेण्यासाठी ‘मेंटर इंडिया गोलमेज परिषद’हा उपक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील प्रमुख मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले होते.
मेंटर इंडिया हा अटल इनोव्हेशन मिशन,नीती आयोगाचा एक धोरणात्मक राष्ट्रीय उभारणीसाठीचा उपक्रम आहे. या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब्स आणि स्टार्टअप्समधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग तज्ञ यांना पाचारण केले जाते. हे व्यावसायिक
टिंकरिंग लॅब्समध्ये नवोन्मेष आणि उद्योजकता क्षेत्रातील कार्यांना सुलभ करण्यास मदत करतात आणि भारतातील नवोदित नवोन्मेषकारांची नवीन पिढी सुद्धा घडवतात.
नीती आयोगाच्या आवारात आयोजित कार्यक्रमादरम्यान ‘द जेम्स ऑफ मेंटॉर इंडिया’नावाचे हँडबुक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात शालेय विद्यार्थ्यांमध्ये फेरबदल करण्यासाठीची उपक्रमशीलता वाढवण्यासाठी विविध मार्गदर्शकांनी अनुसरण केलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा समावेश आहे.
‘मेंटॉर इंडिया’समुदायाच्या मदतीने, विद्यार्थ्यांना दरवर्षी त्यांचे डिजिटल उत्पादन विकसित करण्यासाठी तांत्रिक आणि उद्योजक कौशल्ये आत्मसात करता येतात.अटल टिंकरिंग लॅबच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमाला 'टिंकरप्रेन्योर’ या नावाने ओळखले जाते.
टिंकरप्रेन्योर अंतर्गत, अटल इनोव्हेशन मिशन च्या सहकार्याने आयोजित केलेल्या अटल कॅटॅलिस्ट कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठित इंडियन स्कूल ऑफ बिझनेसकडून दरवर्षी 100 सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना निवडून 8 महिन्यांसाठी त्यांना मार्गदर्शन दिले जाते. गेल्या वर्षी, सर्वोत्कृष्ट 20 विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना गुंतवणूकदारांसमोर मांडण्याची संधी मिळाली आणि त्यापैकी 10 विद्यार्थ्यांना त्यांचे व्यावसायिक प्रतिमान विकसित करण्यासाठी निधी मिळाला आहे. मेंटॉर इंडिया गोलमेज परिषदे दरम्यान या 20 विद्यार्थ्यांना त्यांचे यश साजरे करण्यासाठी "द इनजेनियस टिंकरप्रेन्युअर्स" हे कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान अटल इनोवेशन मिशनच्या टिंकरप्रेन्योर या उपक्रमाविषयी बोलताना, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर म्हणाले की “या विशिष्ट मोहिमेत मुली आघाडीवर आहेत हे पाहणे आश्चर्यकारक आहे. मला वाटते की त्या इतर अनेक ठिकाणी सुद्धा आता आघाडी घेत आहेत.”
ख्यातनाम भारतीय धावपटू अंजू बॉबी जॉर्ज आणि इंडियन बिझनेस स्कूलचे संचालक प्रा. भगवान चौधरी, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या दोघांनी मार्गदर्शकांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थ्यांना त्यांचे आत्मभान सदैव जागृत ठेवण्यासाठी आणि नेहमी आघाडीवर राहण्यासाठी प्रोत्साहित केले.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874841)
Visitor Counter : 182