माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची भेट घेतली

Posted On: 08 NOV 2022 10:02PM by PIB Mumbai

गोवा, 8 नोव्‍हेंबर 2022

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि मत्स्योद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी  आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांनी 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या महोत्सवात  भारतातून तसेच जगभरातून नामवंत  आणि चित्रपट क्षेत्रातील मंडळी  मोठ्या संख्येने सहभागी  होण्याची अपेक्षा असल्याने,  अत्यंत उच्च दर्जाची तयारी सुनिश्चित  करण्याकडे  विशेष लक्ष दिले जात आहे.

मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांनी गोव्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या पैलूंवर तसेच या क्षेत्राच्या वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील यावरही चर्चा केली. 53 वा इफ्फी महोत्सव  आणि इतर विविध विकास प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले होते.

 

* * *

PIB Panaji | N.Chitale/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1874582)
Read this release in: English , Urdu , Hindi