राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुरूनानक देव जी जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 07 NOV 2022 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला गुरूनानक देव जी जयंतीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या, गुरुनानक देवजी यांच्या जयंतीच्या शुभ प्रसंगी, मी सर्व देशबांधवांना आणि परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना आणि शीख बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देते.

गुरुनानक देवजी यांनी ‘एक ॐकार’ हा संदेश दिला. याचा अर्थ असा आहे, की परमेश्वर एक आहे आणि सर्वव्यापी आहे. त्यांनी आपल्याला प्रेम, एकता आणि बंधुभाव आचरणात आणावा यासाठी प्रेरणा दिली. ‘जपजी साहिब’ यांच्या शिकवणीतून आपण आयुष्यात सत्य, त्याग आणि नैतिक आचरण ही शाश्वत मूल्ये अंगीकारली  पाहिजे. ‘किरत  करो’ आणि ‘वंड  छको’ हे संदेश आपल्याला प्रामाणिकपणे जगायला आणि उपलब्ध स्रोत इतरांसोबत वाटून घ्यायला प्रेरणा देतात.  गुरु नानक देवजी यांनी आपल्याला नम्रता आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांची शिकवण आपल्याला शांती आणि समृद्धीच्या दिशेने मार्गदर्शन करेल.

या शुभ प्रसंगी आपण त्यांची शिकवण आचरणात आणूया आणि मानवतेच्या कल्याणाच्या भावनेने कार्य करुया.

राष्ट्रपतींचा हिंदी संदेश बघण्यासाठी इथे क्लिक करा.  

 

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1874371) आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi