भारतीय निवडणूक आयोग
ओदिशा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 1 (एक) अशा 5 (पाच) विधानसभा आणि उत्तर प्रदेशातील 1 (एक) लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वेळापत्रक
Posted On:
05 NOV 2022 4:29PM by PIB Mumbai
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, बिहार आणि छत्तीसगडमधील खालील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Sl. No.
|
Name of State
|
Parliamentary Constituency No. & Name
|
1.
|
Uttar Pradesh
|
21-Mainpuri (PC)
|
Sl. No.
|
Name of State
|
Assembly Constituency No. & Name
|
-
|
Odisha
|
01-Padampur
|
-
|
Rajasthan
|
21-Sardarshahar
|
-
|
Bihar
|
93-Kurhani
|
-
|
Chhattisgarh
|
80-Bhanupratappur (ST)
|
-
|
Uttar Pradesh
|
37-Rampur
|
पोटनिवडणुकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक
|
Poll Events
|
Schedule
|
Date of Issue of Gazette Notification
|
10th November, 2022
(Thursday)
|
Last Date of Nominations
|
17th November, 2022
(Thursday)
|
Date for Scrutiny of Nominations
|
18th November, 2022
(Friday)
|
Last Date for Withdrawal of candidatures
|
21st November, 2022
(Monday)
|
Date of Poll
|
5th December, 2022
(Monday)
|
Date of Counting
|
8th December, 2022
(Thursday)
|
Date before which election shall be completed
|
10th December, 2022
(Saturday)
|
1. मतदार याद्या
उपरोक्त लोकसभा/विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या 5 जानेवारी, 2022 रोजी प्रकाशित झाल्या. याची पात्रता तारीख 01.01.2022 होती.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतच्या सुधारणा या निवडणुकांसाठी वापरल्या जातील.
2. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट
आयोगाने सर्व मतदान केंद्रांवर पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपलब्ध केले आहेत. या यंत्रांच्या मदतीने मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी सर्व पावले उचलली आहेत.
3. मतदारांची ओळख
छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र (ईपीआयसी) हा मतदाराच्या ओळखीचा मुख्य दस्तऐवज असेल. तथापि, खालीलपैकी कोणतेही ओळखपत्र मतदान केंद्रावर दाखवले जाऊ शकते:
i आधार कार्ड,
ii मनरेगा ओळखपत्र (जॉब कार्ड),
iii बँक/टपाल कार्यालयाने जारी केलेले फोटोसह पासबुक,
iv कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,
v. वाहनचालक परवाना,
vi पॅन कार्ड,
vii एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड,
viii भारतीय पारपत्र,
ix छायाचित्रासह निवृत्तीवेतन दस्तऐवज,
x केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे आणि
xi खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे.
xii विशेष दिव्यांग ओळखपत्र (युडीआयडी) ओळखपत्र, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार
4. आदर्श आचारसंहिता
लोकसभा/विधानसभा निवडणूक होत असलेल्या जिल्ह्यात (जिल्ह्यांमध्ये) त्या मतदारसंघाचा संपूर्ण किंवा कोणताही भाग समाविष्ट आहे, तिथे तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू होईल. आयोगाच्या दिनांक 29 जून 2017 रोजी जारी केलेल्या 437/6/1NST/2016-CCS निर्देश क्रमांकानुसार आंशिक बदलाच्या हे अधीन आहे. (आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध).
5. गुन्हेगारी पार्श्वभूमी संबंधित माहिती
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या कालावधीत तीन वेळा या संदर्भातील माहिती वर्तमानपत्रात आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे प्रकाशित करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे करणार्या राजकीय पक्षाने त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तीन वेळा प्रकाशित करणे आवश्यक आहे.
6. पोटनिवडणुकीदरम्यान कोविड संबंधित व्यवस्था-
देशभरातील कोविडच्या परिस्थितीतील एकूण सुधारणा लक्षात घेता आणि एनडीएमए/एसडीएमएद्वारे डीएम कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक उपाय मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर, केन्द्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात आला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान, चाचणी-मागोवा-उपचार-लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक वर्तनाचे पालन या पंचतत्व धोरणावर सतत लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आयोगाने 14.10.2022 रोजी कोविड मार्गदर्शक तत्त्वे, ऑक्टोबर, 2022 जारी केली आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर https://eci.gov.in/files/file/14492-covid-guidelines-for-general-electionbye-elections-to-legislative-assemblies-reg/ ती उपलब्ध आहेत.
निवडणूक काळात याचे पालन करायचे आहे.
***
S.Kane/V.Ghode/PK
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1873941)
Visitor Counter : 253