जलशक्ती मंत्रालय

जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी भूषवले काही मुख्य कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान

Posted On: 04 NOV 2022 9:29PM by PIB Mumbai

3 तांत्रिक सत्रे आणि 4 पॅनेल चर्चासत्रे झाली

पूर आणि दुष्काळ अशा पाण्याशी संबंधित आपत्तींचे व्यवस्थापन, सहयोगी जल प्रशासन व्यवस्था आणि पर्यावरण तसच उपजीविकेसाठी पाण्याचा वापर या विषयांवर, 3 तांत्रिक सत्रे झाली. तर, शहरी जल नियोजन आणि व्यवस्थापनासमोरील आव्हाने, IBWT (इंटर-बेसिन वॉटर ट्रान्सफर) अर्थात नदी जोड म्हणजेच एका नदीच्या पात्रातील पाणी दुसऱ्या नदीच्या पात्रात सोडणे बाबत राष्ट्रीय दृष्टीकोन, अकल्पित परिस्थितीत शेती तगवून ठेवणे आणि ऊर्जा सुरक्षेसाठी   जलविद्युतनिर्मितीची भूमिका, या विषयांवर चार पॅनेल चर्चासत्रे झाली. या शिवाय, जागतिक बँकेद्वारे राबवले जाणारे जलव्यवस्थापनातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, भारत-EU (युरोपीय महासंघ) भागीदारी, आणि जागतिक बँकेचा संस्थांवरील एक कार्यक्रम, असे तीन इतर कार्यक्रमसुद्धा झाले. या व्यतिरिक्त, PMKSY + CADWM, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प (NHP) आणि धरण सुरक्षा व्यवस्थापन, आणि DRIP वर असे 3 कार्यक्रमही  जलशक्ती मंत्रालयाने केले.

जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या PMKSY+CADWM आणि राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प (NHP) वरील कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषवले आणि त्यांचे विचार मांडले.  PMKSY+CADWM आणि NHP योजनांच्या अंमलबजावणीमध्ये जलशक्ती मंत्रालयाने मिळवलेल्या यशाची जलशक्ती राज्यमंत्र्यांनी प्रशंसा केली. वाढत्या अन्न आणि जल सुरक्षेची शाश्वत पूर्तता करण्यासाठी, जलस्रोत प्रकल्पांचा वेगाने विकास होणे आवश्यक असून त्यासाठी एकात्मिक आणि सर्वांगीण दृष्टीकोनाची गरज आहे यावरही त्यांनी भर दिला. प्रलंबित तसेच भविष्यातील प्रकल्पांवर आणि त्यांच्या जलद अंमलबजावणी बाबत असलेले आपापसातले मतभेद सौहार्दाने सोडवून एकमत घडवण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पाण्याचे शाश्वत संवर्धन करण्यासाठी राबवण्यात येणारे उपाय यावर आधारित प्रदर्शन आणि स्टॉल्सना पटेल यांनी भेट दिली.

पूर आणि दुष्काळ यांसारख्या पाण्याशी संबंधित आपत्तींचे व्यवस्थापन' या विषयावर झालेल्या चर्चासत्रात, गेट कंट्रोल तंत्राद्वारे AI/ML तंत्रावर आधारीत पूराबाबतचा इशारा, पूर आणि दुष्काळ व्यवस्थापनासाठी पूरक अशी निर्णय व्यवस्था, गणितीय मांडणीच्या माध्यमातून पूराचे अंदाज बांधणे, पावसाच्या पाण्याची साठवणूक, तांत्रिक उपाय, पूरप्रवण आणि पाण्याचा निचरा होऊ न देणारी जलनि:सारण परिसंस्था, पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी अंदाजावर आधारीत पुराच्या पाण्याचा निचरा करणारी जलनि:सारण व्यवस्था, या विषयांवर चर्चा करण्यात आली.

'सहयोगी जल प्रशासन व्यवस्था स्थापन करणे' या विषयावरील दुसर्‍या परिसंवादात, नायट्रोजनच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या कृषी प्रदूषणाच्या समस्या, पीक आणि नायट्रोजनचे संतुलन राखणे, अचूक सिंचन पद्धत जाणून घेणे, लागवडीचे तंत्र अनुकूल करणे, सीएसआर अंतर्गत पर्यावरणीय कारणांसाठी उद्योगांचे सहकार्य मिळवणे, पाणी संतुलन आणि त्याचे लेखापरीक्षण, भूजलविषयक अंदाज, फरक्का धरणा अंतर्गत गंगा नदीतील मत्स्य संवर्धनाचे क्षेत्र, भूजल साठ्याच्या शाश्वतते पुढील आव्हाने आणि PRS मॉडेलद्वारे भूजलाची पुनर्भरण यंत्रणा, यावर चर्चा करण्यात आली.

पर्यावरण आणि उपजीविकेसाठी पाण्याचा वापर' या चर्चासत्रा अंतर्गत, आंतरराज्यीय नद्यांमधील पर्यावरणानुसार बदलणाऱ्या प्रवाहांच्या व्यवस्थापना समोरील आव्हाने, परिसंस्थांचे अस्तित्व, लोक आणि अर्थशास्त्र, पाण्याच्या गुणवत्तेवरील देखरेखीसाठी नाविन्यपूर्ण आराखडे, जल साधनसंपत्ती, जैविक आरोग्याची दर्जात्मक स्थिती, खारफुटी संवर्धनात स्थानिक मच्छीमारांची भूमिका, सामाजिक-आर्थिक विकास आणि दर्जेदार पायाभूत सुविधांच्या एकसमान बळकटीकरणासह शाश्वत प्रगती, पाणी साठवण्यासाठी पायऱ्यांच्या विहिरी पुन्हा बांधणे किंवा त्यांचे पुनरुज्जीवन, या विषयांवर चर्चा झाली.

शहरी जलनियोजनातील आव्हाने या विषयावरील पॅनेल चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सिंगापूरचे मोह. टायिंग लियांग, होते. संस्थात्मक तसेच औद्योगिक स्तरावर, शहरी पूर नियंत्रण तंत्रज्ञानाच्या विकासावर या चर्चासत्रात भर देण्यात आला. गरज आणि शाश्वत विकास यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी प्रशासनाकडून नवीनातील नवीन तंत्रज्ञान, तसेच कार्यपद्धतींच्या औपचारिक स्वीकृतीची आवश्यक आहे यावरही यात भर देण्यात आला.

याव्यतिरिक्त, IBWT (इंटर-बेसिन वॉटर ट्रान्सफर) बाबत राष्ट्रीय दृष्टीकोन आणि त्याबाबतच्या विविध समस्या, तसच पाणी आणि अन्न सुरक्षेची उद्दीष्टं साध्य करण्यासाठीचे महत्वाचे उपाय, यावर आणखी एक महत्त्वपूर्ण पॅनेल चर्चासत्र झाले.

या व्यतिरिक्त, आकस्मिक परिस्थितीतील कृषी शाश्वततेवर आणखी एक पॅनेल चर्चासत्र झाले.

***

STupe/AS /CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873907) Visitor Counter : 157


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi