संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात सामील झालेल्या आणि 10 वर्ष सेवा दिलेल्या जेसीओ/ ओआरना संरक्षण मंत्रालयाकडून निर्धारित प्रमाणात निवृत्तिवेतन लाभ 

प्रविष्टि तिथि: 04 NOV 2022 6:30PM by PIB Mumbai

 

संरक्षण क्षेत्रात किमान 10 वर्ष सेवा दिलेल्या आणि केंद्रीय सार्वजनिक संस्था/केंद्रीय स्वायत्त संस्थांमध्ये किंवा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात कायमस्वरूपी नियुक्ती झालेल्या जेसीओ/ओआर यांना संरक्षण मंत्रालय प्रो रेटा पेन्शन अर्थात निर्धारित  प्रमाणात निवृत्तीवेतन देणार  आहे. याआधी हा लाभ केवळ नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांपुरताच मर्यादित होता.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भात माजी सैनिक विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे आणि मंत्रालयाने 04.11.2022 रोजी आवश्यक आदेश जारी केला आहे. या आदेशातील तरतुदीनुसार संरक्षण सेवेत किमान 10 वर्ष पात्र सेवा दिलेले जेसीओ/ओआर या आदेशाच्या तरतुदींनुसार प्रो-रेटा पेन्शन मिळविण्यास पात्र असतील.

सार्वजनिक क्षेत्रातील संस्था / केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (06.03.1985 रोजी किंवा नंतर) किंवा केंद्रीय स्वायत्त संस्था (31.03.1987 रोजी किंवा नंतर) मध्ये कार्यरत /नियुक्त झालेल्या जेसीओ/ओआर यांना या तरतुदी लागू होतील. मात्र , यापूर्वीच्या  प्रकरणांमधील आर्थिक लाभ हा आदेश जारी केल्याच्या तारखेपासून संभाव्यपणे मंजूर केला जाईल.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1873789) आगंतुक पटल : 267
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी