संरक्षण मंत्रालय
दिल्ली छावणी क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग पॉइंट्स उभारण्यासाठी भारतीय लष्कराचा टाटा पॉवरसोबत सहयोग
Posted On:
02 NOV 2022 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022
भारतीय लष्कराने आपल्या 'गो-ग्रीन उपक्रमाद्वारे' दिल्ली छावणी क्षेत्रातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) 16 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा पॉवर या भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत सुविधा संस्थेसोबत सहयोग केला आहे. चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन आज दिल्ली विभागाचे जीओसी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते झाले. यावेळी लष्करी अधिकारी आणि टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दिल्ली छावणी क्षेत्रात उभारलेले सर्व 16 चार्जिंग स्टेशन हे दिल्ली छावणी क्षेत्रातील खासगी आणि सरकारी इलेक्ट्रिक वाहनांसाठी वापरले जाऊ शकतात. भारतीय लष्कर हे चार्जरला उर्जा देण्यासाठी अपस्ट्रीम ऊर्जा पायाभूत सुविधा व्यवस्था करण्याबरोबरच ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी योग्य सुविधा पुरवत आहे.
टॉरस स्टेशन कॅन्टीनमध्ये पहिल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन करताना, दिल्ली विभागाचे जीओसी, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ म्हणाले, "भारत सरकारच्या नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅनच्या (NEMMP) अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रिक गतिशीलता अभियान योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने आणि लष्कराच्या ‘गो-ग्रीन’ उपक्रमाच्या अनुषंगाने भारतीय लष्कर आणि टाटा पॉवरचे हे एक अनोखे पहिले पाऊल आहे. उत्सर्जनमुक्त पर्यावरण, मानवजातीचे भावी पिढ्यांसाठी असलेले बंधनकारक कर्तव्य बजावण्यासाठी या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1873210)
Visitor Counter : 217