रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून इलेक्ट्रॉनिक बँक हमीचा स्वीकार सुरु

Posted On: 02 NOV 2022 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022

अंतर्गत व्यवस्थेतील कार्यक्षमता आणि पारदर्शकतेत अधिक सुधारणा करण्यासाठी तसेच, डिजिटल तंत्रज्ञानाचा अंगीकार वाढवण्यासाठी, एनएचएआय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने, इलेक्ट्रॉनिक बँक हमी (E-BGs) चा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सध्या असलेल्या सर्व बँक हमीपत्रांचे डिजिटलीकरणही केले आहे. एनएचएआय, राष्ट्रीय ई-प्रशासन सेवा लिमिटेडच्या ई-बीजी सेवांचा वापर करत आहे. यामुळे प्रत्यक्ष कागदाचा वापर कमी झाला असून, कागदांची साठवण करण्याची गरज उरलेली नाही. तसेच, काही बँक हमीविषयक घटना, जसे की इनव्होकेशन (आवाहन), नूतनीकरण आणि बंद करण्याच्या प्रक्रिया करतांना बँक हमीपत्र सहजपणे उपलब्ध होऊ शकेल. बँकांनी आतापर्यंत, एनएसएआय ला काही ई-हमीपत्रे E-BGs जारीही केली आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव आणि एनएचएआयच्या अध्यक्षा अलका उपाध्याय यांनी सांगितले, ई-बँक हमीचे फायदे लक्षात घेऊन, आम्ही सवलत देणाऱ्यांना ई-बँक हमी देण्यासाठी प्रोत्साहन देतो. डिजिटल इंडियासाठी हे पूरक पाऊल आहे. ई-बँक हमीमुळे, पारदर्शकता वाढते, अनेक क्षेत्रातील काम प्रभावी होऊन, आमच्या सर्व भागधारकांना व्यापार सुलभता मिळते.

बँक हमी- हा एक व्यावसायिक दस्तऐवज असून, त्याचा कायदेशीर कराराप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. याअंतर्गत, बँक एक हमीदार म्हणून असते, जर मूळ करारातील कर्जदार, आपल्या कराराचे पालन करत निधी देऊ शकला नाही, तर एक निश्चित रक्कम बँक लाभार्थ्याला देईल, याची जबाबदारी बँक घेते. एनएचएआय सारख्या संस्थांना, या कराराचे पालन करण्यासाठी, बँक हमीची गरज लागते. बँक हमीच्या प्रत्यक्ष अर्जात/करारपत्रात, वेळखाऊ अशा पडताळणी प्रक्रिया समाविष्ट असतात, ज्यात काही गैरव्यवहार होण्याचीही शक्यता असते. मात्र, आपल्या अंतर्गत प्रक्रिया यंत्रणेच्या मदतीने, एनचएआय, बँक हमीशी संबंधित प्रश्न आणि आव्हांनाचा प्रभावीपणे तसेच कार्यक्षमतेने सामना करत आहे.

 

 

 

N.Chitale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873185) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi