जलशक्ती मंत्रालय
1 ते 5 नोव्हेंबर 2022 दरम्यान ‘भारत जल सप्ताह’ साजरा केला जाणार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जल सप्ताहाचे करणार उद्घाटन
Posted On:
31 OCT 2022 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2022
जलसाठे संवर्धन आणि जलस्त्रोतांचा वापर करताना काळजी घेणे, याबाबत जनजागृती करण्यासाठी जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्यावतीने 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान आयडब्ल्यूडब्ल्यू – 2022 म्हणजेच ‘भारत जल सप्ताहा’ च्या 7 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे. या मंचाच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील निर्णय घेणारे, राजकारणी, संशोधक आणि उद्योजक यांच्या कल्पना आणि मते जाणून घेण्यात येणार आहेत. 7व्या भारतीय जल सप्ताहाची संकल्पना "शाश्वत विकास आणि समानतेसाठी जल सुरक्षा" अशी आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील तज्ज्ञ, नियोजनकर्ते आणि संबंधित हितधारक एकत्र येतील.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. पाण्याशी संबंधित आव्हाने आणि व्यवस्थापन या संदर्भात होत असलेल्या कामाला त्यांच्या उपस्थितीमुळे सर्वांना प्रेरणा मिळेल.
या कार्यक्रमात शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अनुषंगाने जलस्रोत विकास आणि व्यवस्थापनाच्या शाश्वततेच्या मुद्द्यांकडे लक्ष दिले जाईल. या कार्यक्रमात चर्चासत्र, समूह चर्चा, इतर अनुषंगिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह परिषदांचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमामध्ये डेन्मार्क, सिंगापूर आणि फिनलंड हे भागीदार देश असतील.
आयडब्ल्यूडब्ल्यू – 2022 ची संकल्पना समृद्ध करणारी आहे. तसेच अनेक-विषयांवर परिषद आणि प्रदर्शन एकाच वेळी सादर केले जाईल. तसेच संमेलनामध्ये विचाराधीन असलेल्या क्षेत्रांसाठी उपलब्ध तंत्रज्ञान आणि उपायांचे प्रदर्शन केले जाईल.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1872444)
Visitor Counter : 252