शिक्षण मंत्रालय

भारतात 'फुटबॉल फॉर स्कूल्स ' हा उपक्रम राबवण्यासाठी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फिफा आणि एआयएफएफ सोबतच्या सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी


'फुटबॉल फॉर स्कूल्स' हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा पुरस्कार करतो- धर्मेंद्र प्रधान

खेळाच्या सामर्थ्याचा उपयोग करून सुजाण नागरिक तयार करण्यासाठी 'फुटबॉल फॉर स्कूल्स' हा उपक्रम - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 30 OCT 2022 7:20PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांनी शिक्षण मंत्रालयाच्या वतीने भारतातील 'फुटबॉल फॉर स्कूल्स' या उपक्रमासाठी फिफा आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. फिफाचे  अध्यक्ष, जियानी इन्फँटिनो; केंद्रीय गृह आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री  निशीथ प्रामाणिक; महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर; अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे; नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त  विनायक गर्ग आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये खेळांना सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे आणि 'फुटबॉल फॉर स्कूल्स ' हा  उपक्रम  राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा  पुरस्कार करतो, असे प्रधान यांनी यावेळी बोलताना सांगितलॆ. राष्ट्रीय 2020 मध्ये खेळांना सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे. माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांनी शिक्षणासोबत खेळाला  मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला आहे. आणि फुटबॉल फॉर स्कूल्स हा उपक्रम, खेळाला जीवनाचा मार्ग बनवण्याचा  तसेच सुजाण नागरिक घडवण्याचा  दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक पाऊल आहे, असेही ते म्हणाले.

17 वर्षांखालील फुलबॉल महिला विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने, या सामंजस्य कराराच्या माध्यमातून फिफा भारतीय फुटबॉल आणि भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण विद्यार्थ्यांना बहुमूल्य जीवन कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी एकत्र सहकार्य करत आहेत.

फुटबॉल हा एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे आणि 'फुटबॉल फॉर स्कूल्स' हा उपक्रम  मुलांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी एक सकारात्मक साधन आहे, असे प्रधान यांनी सांगितले. भारतातील  25 लाख तरुण मुला-मुलींना क्रीडा-एकात्मिक शिक्षणाद्वारे सक्षम बनवण्याचे 'फुटबॉल फॉर स्कूल्स ' या उपक्रमाचे  उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.

'फुटबॉल फॉर स्कूल्स ' या उपक्रमाचे फायदे:-

विद्यार्थ्यांना (मुले आणि मुलींना)बहुमूल्य जीवन कौशल्ये आणि क्षमतांनी सक्षम करणे

- खेळ आणि जीवन-कौशल्य उपक्रम उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षणासह  सक्षम करणे आणि प्रशिक्षक-शिक्षक प्रदान करणे

- फुटबॉलच्या माध्यमातून जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी हितसंबंधितांची (शाळा, सदस्य संघटना आणि सार्वजनिक अधिकारी)क्षमता बांधणी करणे 

- भागीदारी, युती आणि आंतरक्षेत्रीय सहकार्य सक्षम करण्यासाठी, सरकार आणि सहभागी शाळा यांच्यातील सहकार्य बळकट करणे.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872067) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia