आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 219 कोटी 63 लाखापेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या.


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 4 कोटी 12 लाखांहून अधिक पहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची उपचाराधीन कोविड रुग्णसंख्या 18,317

गेल्या 24 तासांत देशात 1,604 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.77%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.08%

Posted On: 30 OCT 2022 10:01AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालातील तात्पुरत्या आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 219.63 कोटींचा (2,19,63,57,449) टप्पा ओलांडला आहे. 16 मार्च 2022 रोजी देशातील12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 12 लाखांहून अधिक (4,12,47,850) किशोरवयीन मुलामुलींना  कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415419

2nd Dose

10120694

Precaution Dose

7075090

FLWs

1st Dose

18437171

2nd Dose

17720688

Precaution Dose

13752688

Age Group 12-14 years

1st Dose

41247850

2nd Dose

32388672

Age Group 15-18 years

1st Dose

62015305

2nd Dose

53346540

Age Group 18-44 years

1st Dose

561421543

2nd Dose

516350969

Precaution Dose

100834630

Age Group 45-59 years

1st Dose

204049381

2nd Dose

197081046

Precaution Dose

50811442

Over 60 years

1st Dose

127681777

2nd Dose

123222992

Precaution Dose

48383552

Precaution Dose

22,08,57,402

Total

2,19,63,57,449

 

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 18,317 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.04% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.77% झाला आहे. गेल्या 24 तासांत 2,801 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,41,04,933 झाली आहे.


गेल्या 24 तासांत, देशात नव्या 1,604 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 1,57,218 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 90 कोटी 08 लाखांहून अधिक (90,08,82,915) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.08% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.02% इतका नोंदला गेला आहे.

***

NilimaC/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1871959) Visitor Counter : 223