राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

छठपूजेच्या पूर्वसंध्‍येला राष्‍ट्रपतींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 29 OCT 2022 9:15PM by PIB Mumbai

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना छठपूजेच्या पूर्वसंध्‍येला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका संदेशात  राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, ‘’ छठ पूजेच्या निमित्ताने, मी भारतातल्या सर्व नागरिकांना आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या हार्दिक शुभेच्छा देते.

निसर्गाविषयी आपला आदर, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्‍याची  पद्धतम्हणजे छठ पूजा पर्व आहे. सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण करून, भक्त त्यांच्या दिवसाचा  प्रारंभ करतात. दिवसभर उपवास  केला जातो.  सूर्य आणि नद्यांची पूजा केली जाते. पवित्र जलकुंभामध्‍ये  स्नान आणि निसर्गदेवतेची पूजा करून  उपवासाची सांगता केली जाते. हा सण म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर एकरूपतेचे- सौहार्दाचे अनोखे उदाहरण आहे.

या वर्षीच्या छठ पूजेच्या उत्सवात  लोकांच्या  मनोकामना पूर्ण व्हाव्यात  आणि सर्वजण निरोगी आणि आनंदी रहावेत.  छठचे औचित्य साधून जलस्रोत आणि पर्यावरण प्रदूषणमुक्त करण्‍याची  शपथ घेण्याची   संधी आपण घेऊ या’’.

राष्‍ट्रपतींचा संदेश पाहण्‍यासाठी येथे क्लिक करावे.

***

R.Aghor/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1871893)
Read this release in: English , Urdu , Hindi