PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
28 OCT 2022 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 28 ऑक्टोबर 2022
- 219.60 cr Total Vaccine doses (95.01 cr Second Dose and 22.06 cr Precaution Dose) have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 1,60,714 doses administered in last 24 hours
- India's Active caseload currently stands at 19,398
- Active cases stand at 0.04%
- Recovery Rate currently at 98.77%
- 3,619 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 4,41,00,691
- 2,208 new cases recorded in the last 24 hours
- Daily positivity rate (1.55%)
- Weekly Positivity Rate (1.12%)
- 90.05 cr Total Tests conducted so far; 1,42,704 tests conducted in the last 24 hours
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCoron
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.60 (2,19,60,45,500) कोटींची संख्या ओलांडली आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.12 (4,12,41,936) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
भारतातील रुग्णसंख्या सध्या 19,398 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.77% झाला आहे. गेल्या 24 तासांत 3,619 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून) वाढून 4,41,00,691 झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,208 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 1,42,704 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 90.05 (90,05,59,796) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.12% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.55% आहे.
S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1871649)
Visitor Counter : 219