नौवहन मंत्रालय
व्ही. ओ. चिदंबरनार बंदराचा आणखी एक विक्रम; पवनचक्कीच्या पंख्याची आयात केलेल्या पात्यांच्या सर्वाधिक संख्येची एका मालपाठवणीत हाताळणी
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2022 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022
तामिळनाडूतील तुतीकोरीन येथील व्ही. ओ. चिदंबरनार बंदराने 27 ऑक्टोबर 2022 रोजी एका मालपाठवणीत पवनचक्कीच्या पंख्याची आयात केलेली 120 पाती हाताळण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी एका मालपाठवणीत 60 पाती हाताळल्याचा विक्रम होता. बंदरातील दोन मोबाईल क्रेनच्या सहाय्याने, कार्गो सुरक्षेबाबत सर्व काळजी घेऊन कार्गो हाताळणी कर्मचाऱ्यांनी 120 पाती यशस्वीरित्या उतरवून घेतली.

‘एम व्ही नान फेंग जी शिंग’ हे सपाट बुडाचे जहाज प्रत्येकी 76.8 मीटर लांबीची 120 पाती घेऊन 25 ऑक्टोबर 2022 रोजी बंदरात आले. त्यानंतर 44 तासांत ही पाती उतरविण्यात आली. चीनमध्ये बनविलेली ही पाती चांगशू बंदरातून भारतात पाठविण्यात आली. त्यांचा देशभरातील विविध ठिकाणच्या पवनऊर्जा प्रकल्पांमध्ये वापर केला जाणार आहे.

व्ही. ओ. चिदंबरनार बंदराचे अध्यक्ष टी. के. रामचंद्रन म्हणाले, “पवनचक्कीच्या पंख्याची आयात केलेली पाती यशस्वीरित्या उतरवून घेण्यासाठी व्ही. ओ. चिदंबरनार बंदराने पुरविलेली सेवा हे देशातील नवीनीकरणीय ऊर्जानिर्मितीची क्षमता वाढविण्यासाठी व त्यातून शाश्वत विकासाच्या दिशेने जाण्यासाठी दिलेले थेट योगदान आहे.”
S.Kane/R.Bedekar/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1871555)
आगंतुक पटल : 201