आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 सदस्य देशांच्या आरोग्यमंत्र्यांच्या दुसऱ्या बैठकीच्या समारोप प्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे निवेदन


जागतिक आरोग्यविषयक सुविधा “उद्दिष्टासाठी योग्य’ करण्याची गरज असल्याचा आरोग्यमंत्र्यांचा पुनरुच्चार

“कोविड-19 महामारीचे व्यवस्थापन करण्यासाठी जी-20 देशांनी केलेल्या प्रयत्नांचे सूत्रबद्ध एकीकरण करण्यासाठी एक कायमस्वरूपी वैद्यकीय प्रतिबंधक मंच निर्माण करणं त्याद्वारे सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणाऱ्या निदानक्षम लसी आणि उपचार पद्धती विकसित करण्याची गरज ”: डॉ मालवीय

“आरोग्यविषयक आपत्कालीन प्रतिबंधक व्यवस्था, सज्जता आणि प्रतिसाद ; सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय प्रतिबंधक उपायांच्या उपलब्धता आणि डिजिटल आरोग्य नवोन्मेष यावर लक्ष केंद्रित करून औषध निर्मिती क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे; आणि आरोग्यव्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी सहाय्य तसेच आगामी अध्यक्षपदाच्या काळात आरोग्य क्षेत्रातील कृती गटांसाठी आरोग्य सेवा वितरण सुधारण्याला भारताचे प्राधान्य

Posted On: 28 OCT 2022 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022

जागतिक आरोग्य संघटना (SETA),गावी, जी-7 आणि जी-20 अशा सर्व संस्थांना शाश्वत आर्थिक पुरवठा, मानवी उत्पादन संस्थेमध्ये सुधारणा आणि या संस्थांमध्ये आंतर-मंत्रालयीन वाटाघाटी/चर्चा अशा सर्व गोष्टींमधून, जागतिक आरोग्य व्यवस्था, ‘उद्देशासाठी सुयोग्य’ करणे आवश्यक आहे. असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केले आहे. इंडोनेशियाची राजधानी, बाली इथे, जी-20 सदस्य देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या दुसऱ्या परिषदेच्या समारोपप्रसंगी ते आज बोलत होते.

इंडोनेशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, संपूर्ण जगाने, भविष्यात वैद्यकीय आव्हाने आल्यास त्यासाठी सज्ज राहावे यादृष्टीने आपण सर्वांनी उत्पादन आणि संशोधन केंद्र बनण्यास प्राधान्य द्यावे, आणि वैद्यकीय प्रतिबंधक उपायांची  तयारी करावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला मनसुख मांडवीय यांनी पाठिंबा दिला. याच संदर्भात, त्यांनी कोविड-19 महामारीच्या काळात, सर्व देशांनी केलेल्या प्रयत्नांना एकीकृत स्वरुप देऊन,  एक कायमस्वरूपी वैद्यकीय प्रतिकारव्यवस्था स्थापन करावी आणि सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणाऱ्या निदानक्षम लसी तसेच उपचार पद्धती सर्वांसाठी उपलब्ध होतील, यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केले.

इंडोनेशिया, इटली, सौदी अरेबिया  तसेच जी-20 च्या अध्यक्ष देशाचे कौतूक करत, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी भारताचा, आपत्कालीन आरोग्य प्रतिबंधक व्यवस्था, सज्जता आणि प्रतिसाद; औषधनिर्माण क्षेत्रासोबतचे सहकार्य दृढ करणे, सर्वांना सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय प्रतिबंधक सेवा उपलब्ध होतील, यावर भर देणे, तसेच, डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि आरोग्यव्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी उपाययोजना  तसेच  आरोग्यसेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुधारणे, अशा सर्व गोष्टींना, आगामी अध्यक्षकाळात भारत प्राधान्य देईल, असे मनसुख मांडवीय यांनी सांगितलं.

डॉ. मांडविय यांनी G20 चर्चेला समर्थन देण्यासाठी, पूरक आणि समृद्ध करण्यासाठी पुराव्यावर आधारित पारंपारिक औषधांद्वारे वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाय, परदेशातून उपचारासाठी येणाऱ्यांसाठी प्रवेश विस्तारण्यासाठी तसेच समग्र आरोग्यसेवेसाठी सहकार्य संशोधनावर डिजिटल आरोग्य कार्यशाळा सारख्या उपक्रमांचा प्रस्ताव यावेळी मांडला.

डॉ मांडवीय यांनी आपल्या भाषणाच्या समारोपाच्या वेळी, जी-20 सदस्य देशांच्या सर्व आरोग्य मंत्र्यांना पुढच्या वेळी भारतात होणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीला येण्याचे आमंत्रण दिले. तसेच, जगात सर्वांसाठी समान  आरोग्यव्यवस्थेसाठी सर्वांनी पाठिंबा देण्याचे  आवाहन मांडवीया यांनी केले.

 

S.Kane/R.Aghor/ P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1871553)
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu