सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान संग्रहालयाला 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 1,15,161 जणांनी दिली भेट

Posted On: 27 OCT 2022 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

नवी दिल्लीमध्‍ये तीन मूर्ती मार्गावर असलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला 30 सप्टेंबरपर्यंत 1,15,161 अभ्यागतांनी भेट दिल्याची नोंद झाली आहे.  15 ऑक्टोबर 2022 रोजी, एका दिवसात 3,233 लोकांनी पंतप्रधान संग्रहालयाला भेट दिली. हे संग्रहालय 21 एप्रिल 2022 पासून जनतेसाठी खुले करण्यात आले होते.  

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि  केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायव्यवस्थेमधील  उच्च पदस्थ, राजदूत आणि इतर मान्यवरांसह प्रमुख राष्ट्रीय नेत्यांनी या संग्रहालयाला भेट दिली आहे.

प्रमुख अभ्यागतांच्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे  :

माजी राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद :-

"सर्व बाबतीत  प्रभावी ठरेल अशारितीने  रचना असलेले हे प्रधानमंत्री संग्रहालय आहे.  माजी पंतप्रधान आणि राष्ट्रीय नेत्यांच्या विशिष्ट योगदानाचे हे कलात्मक स्मारक आहे, त्याबरोबरच  स्वतंत्र भारताच्या प्रगतीचा कालातीत खजिना  आहे."

भारताचे माजी उपराष्ट्रपती, एम. व्यंकय्या नायडू :-

"हे आपल्या राष्ट्रीय नेतृत्वातील विविधतेचे प्रदर्शन आणि सन्मान देखील करते आणि त्याद्वारे सर्वसमावेशकतेचा संदेश देते. आपल्याकडे असलेल्या सळसळत्या  लोकशाहीसाठी असे संग्रहालय आवश्यक आहे".

पंतप्रधान  नरेंद्र मोदी :-

"प्रधानमंत्री संग्रहालयाला जो कोणी भेट देईल तो भारतीय लोकशाहीची महानता, तिचे प्रचंड स्वरूप आणि तिच्यामध्‍ये असलेल्या अमर्याद शक्यतांविषयी योग्य प्रकारे जाणून घेवू शकेल."

हे संग्रहालय भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासावर एक व्यापक आणि संतुलित दृष्टीकोन प्रदर्शित करते. या सर्वसमावेशक प्रयत्नाचा उद्देश तरुण पिढीला आपल्या सर्व पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल जागरुक करणे हा आहे.

सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एक नवीन दालन संग्रहालयात जोडले जात आहे. जानेवारी 2023 मध्ये ते जनतेला पाहण्यासाठी खुले केले जाईल. नोव्हेंबर 2022 मध्ये  प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रमाचेही नियोजन करण्यात आले असून सुरुवातीचा भाग भारतातील अंतराळ कार्यक्रमावर आहे.

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1871340) Visitor Counter : 200


Read this release in: Hindi , Odia , English , Urdu , Tamil