संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1947 च्या युद्धात विजय निश्चित करणाऱ्या भारतीय लष्कराच्या हवाई मोहिमेची 75 वर्षे साजरी करण्यासाठी ‘शौर्य दिवसा’च्या समारंभाला संरक्षण मंत्री उपस्थित

Posted On: 27 OCT 2022 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर इथे आज 27 ऑक्टोबर 2022 रोजी ‘शौर्य दिवस’ साजरीकरणाच्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती लाभली. 1947 साली आजच्याच  दिवशी भारतीय लष्करातील पायदळाचे जवान प्रथमच बडगाम इथल्या

विमानतळावर उतरले. त्यामुळे श्रीनगरच्या वेशीवर आलेले घुसखोर मागे वळले आणि जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानाच्या पाठिंब्याने होत असलेली घुसखोरी रोखणे शक्य झाले. त्यामुळे 1947 च्या युद्धातील भारताचा विजय निश्चित झाला. जम्मू-कश्मीर भारतात

सामील करण्याबाबत करारावर महाराजा हरी सिंह आणि भारतीय गणराज्यने स्वाक्षरी  केल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रसंग घडला. तेव्हापासून 27 ऑक्टोबर रोजी ‘पायदळ दिवस’ साजरा केला जातो. यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील ‘पायदळ दिवस’ म्हणून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

देशाचे अखंडत्व आणि एकतेच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान केले असे सशस्त्र दलांतील जवान आणि जम्मू-कश्मीरमधील नागरिकांना संरक्षण मंत्र्यांनी आदरांजली वाहिली. त्यांचे शौर्य आणि त्यागामुळे जम्मू-कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आणि

भविष्यातही राहील, असे संरक्षण मंत्री म्हणाले. सातत्याने अडथळे येत असूनही भारत आज ठामपणे, अखंड उभा आहे तो आपल्या देशाच्या सैनिकांचे धैर्य, त्याग आणि त्या बळावर त्यांनी पाया भक्कम उभारून ठेवल्यामुळे, असे ते म्हणाले. “कधीही हार न होणे ही गौरवाची बाब

नसून, कितीही वेळा हार झाली तरी प्रत्येक वेळी नव्या जोमाने उभे राहता येणे ही गौरवाची बाब आहे. 1947 मधील प्रसंग हा त्यातील एक होता”, असे संरक्षण मंत्री म्हणाले.

श्रीनगरची हवाई हद्द यशस्वीरित्या राखणाऱ्या तुकडीचे जखमी अवस्थेतही नेतृत्व करताना प्राणांची आहुती दिलेल्या, पहिल्या परम वीर चक्राने सन्मानित मेजर सोमनाथ शर्मा यांच्या शौर्याचे स्मरण राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

त्या युद्धसमयी वैमानिक असलेले ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनाईक यांनी जवानांच्या तुकड्यांना योग्य स्थळी योग्य वेळेत पोहोचवण्यासाठी दिलेल्या योगदानाच्या स्मृती संरक्षण मंत्र्यांनी जागविल्या. शत्रूला माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या, राष्ट्राचे सार्वभौमत्व जपण्यासाठी लढणाऱ्या सशस्त्र दलांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जम्मू-कश्मीरच्या जनतेची त्यांनी प्रशंसा केली.

पाकिस्तानने अवैधरित्या  व्यापलेल्या भारताच्या भूप्रदेशातील काही भाग आजही प्रगतीपासून वंचित राहिल्याकडे संरक्षण मंत्र्यांनी लक्ष वेधले. “पाकव्याप्त कश्मीरमध्ये निरपराधी भारतीयांना सामोरे जावे लागणाऱ्या अमानुष प्रसंगांना पूर्णपणे पाकिस्तान जबाबदार आहे. या अत्याचारांचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. आज जम्मू-कश्मीरमधील प्रदेश आणि लडाख विकासाची नवी उंची गाठत आहेत. ही फक्त सुरुवात आहे. भारतीय संसदेने 22 फेब्रुवारी 1994 रोजी एकमताने केलेल्या गिलगिट, बाल्टिस्तान सारखे राहिलेले प्रदेश पुन्हा मिळविण्याच्या ठरावाची अंमलबजावणी करणे, हे आमचे ध्येय आहे,” असे संरक्षण मंत्री म्हणाले.

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1871279) Visitor Counter : 207


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi