उपराष्ट्रपती कार्यालय
‘आध्यात्मिकतेशिवाय जीवन अपूर्ण’, समाजात आध्यात्मिक मानसिकता विकसित करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
ब्रम्हकुमारींचे कार्य भारतीय सांस्कृतिक मूल्यांच्या मध्यवर्ती कल्पनेवरच आधारित, उपराष्ट्रपतींनी केली ब्रम्हकुमारींच्या कार्याची प्रशंसा
Posted On:
25 OCT 2022 5:28PM by PIB Mumbai
राष्ट्रातून असभ्यपणा, अनैतिकता आणि नकारात्मकता समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि समाजामध्ये आध्यात्मिक मानसिकता वाढीला लावण्याच्या आवश्यकतेवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज भर दिला. आध्यात्मिकतेशिवाय जीवनात अपूर्णता आहे असे मत व्यक्त करत धनखड म्हणाले की जगभरातच तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने बदल होत आहेत आणि लोकांच्या आयुष्यात आध्यात्मिकतेला महत्व असेल तर या बदलांचा लोकांच्या आयुष्यावर चांगला परिणाम होईल.
राजस्थानातील माउंट अबू या ब्रम्हकुमारींच्या जागतिक मुख्यालयात आज प्रजापिता ब्रम्हकुमारीचा 85 वा वर्धापनदिन आणि सशक्त, समृद्ध व स्वर्णिम भारताकडे प्रवास या कल्पनेवर आधारित दिवाळी सोहळा याप्रसंगी संबोधित करताना उपराष्ट्रपती बोलत होते.
यावेळी धनखड यांनी माणसाला संपूर्ण मानव म्हणून आकार देणाऱ्या अध्यात्मिकतेला आपल्या शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून संबोधले. आणि अध्यात्मिकता तसेच नीतिमान धर्म जगभरात घेउन जाणाऱ्या ब्रम्हकुमारींची प्रशंसा केली. भारतीय नागरीकत्वाच्या मूल्यांवर भर देणाऱ्या नवीन शिक्षण धोरण- 2020 चे त्यांनी कौतुक केले. “योग्य शिक्षण, योग्य विचार आणि योग्य ज्ञान यामुळेच आपल्याला एक बलशाली देश बनणे शक्य होईल”, असे ते म्हणाले.
ब्रम्हकुमारींचे कार्य हे भारताच्या सांस्कृतिक मूल्यांच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आहे असे वर्णन करत धनखड म्हणाले, जगाच्या कल्याणाचा उदात्त विचार आणि जागतिक आनंद यांचा उगम इथून होतो. हवामान बदलावर मात करण्यासाठी दोन कोटी वृक्षलागवड करणाऱ्या ब्रम्हकुमारींची प्रशंसा करत त्यांनी फक्त माणुसकीच नाही तर ग्रहावरील समग्र सजीवांच्या कल्याणाचा विचार करणारी ही अतुलनीय अशी संस्था असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये उचललेली सकारात्मक पावले आणि दूरदर्शीपणे घेतलेले निर्णय यांचा उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी भारत याआधी कधीही नव्हता अशा वळणावर आहे असे सांगत प्रसारमाध्यमांनी यावर झोत टाकून भारताच्या उदयाचा सोहळा करावा असे सुचवले.
राज्यसभेची भूमिका म्हणजे वयाने वडील असणाऱ्यांची भूमिका, असे सांगत धनखड यांनी आपल्या संविधानकर्त्यांनी नीतीमत्ता आणि दूरदर्शीपणातून देशाला नवीन दिशा देणारी राज्यसभा डोळ्यासमोर ठेवल्याचे सांगितले. अनुकरणीय व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाचे उदाहरण खासदानांनी सामान्य लोकांसमोर ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले
ब्रम्हकुमारी येथील या कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती धनखड यांनी सुदेश धनखड यांच्यासह दिलवाडा मंदीर आणि नाथद्वारा मंदीर येथे भेट देउन प्रार्थना केली.
राजस्थान सरकारचे वने आणि पर्यावरण राज्यमंत्री सुखराम बिष्णोई, ब्रम्हकुमारींची अतिरिक्त प्रमुख राजयोगिनी बी के जयन बहन, ब्रम्हकुमारींचे अतिरिक्त सचिव राजयोगी ब्रिज मोहन,ब्रम्हकुमारींच्या संयुक्त प्रमुख राजयोगिनी बी के मुन्नी बहन, ब्रम्हकुमारींचे व्यवस्थापकिय सचिव राजयोगी बी के मृत्यूंजय, ब्रम्हकुमारीं मल्टिमिडीया प्रमुख राजयोगिनी बी के करुणा इत्यादी या प्रसंगी उपस्थित होते.
***
R.Aghor/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870845)
Visitor Counter : 182