कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषिमंत्री आणि बोत्सवानाचे मंत्री यांच्यातील चर्चेत पोषक तृणधान्यांच्या (न्युट्री-सिरीयल) लागवडीला प्रोत्साहन देण्यावर भर

Posted On: 21 OCT 2022 10:06PM by PIB Mumbai

 

बोत्सवानाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सहकार मंत्री, डॉ. लेमोगांग क्वापे सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज नवी दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. दोन्ही देशां दरम्यानच्या कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.

या बैठकीत, दोन्ही मंत्र्यांनी परस्पर देशांमधील मैत्रीपूर्ण आणि घनिष्ट द्विपक्षीय संबंधांबद्दल समाधान व्यक्त केलं. तोमर म्हणाले की, परदेशी भारतीय बोत्सवानाच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान देत आहेत. दोन्ही देशांच्या शेती-उत्पादनांचे फायदे वाढवण्यासाठी द्विपक्षीय व्यापार आणखी वाढवण्याच्या शक्यतेबद्दल ते बोलले. पोषक तृणधान्यांचे (न्युट्री-सिरीयल) महत्व आणि पोषणमूल्य लक्षात घेता, त्याच्या मोठ्या प्रमाणातील लागवडीला प्रोत्साहन देण्यावर दोन्ही मंत्र्यांनी भर दिला. तोमर यांनी सांगितले की भारत, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष, जागतिक स्तरावर साजरा करण्याची तयारी करत आहे. दोन्ही बाजूंनी आपल्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि याबाबतच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन एकमेकांना दिले. जानेवारी 2010 मध्‍ये दोन्‍ही सरकारांदरम्यानच्या  कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराची मुदत संपली आहे. त्या अनुषंगाने, या सामंजस्य कराराचे लवकर पुनरुज्जीवन करण्यावर दोन्ही मंत्र्यांमध्ये सहमती झाली. आपले स्नेहमय स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल डॉ क्वापे यांनी तोमर यांचे आभार मानले आणि त्यांना बोत्सवाना भेटीचे निमंत्रण दिले.  

***

R.Aghor/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1870135) Visitor Counter : 170


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi