संरक्षण मंत्रालय

‘डिफएक्स्पो  2022’ मुळे  संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भरता' पुढच्या स्तरावर पोहोचेल

Posted On: 21 OCT 2022 7:44PM by PIB Mumbai

 

गुजरातमधील गांधीनगरमध्ये आयोजित 12 वे आणि आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण प्रदर्शन - डिफएक्स्पो 2022 ची संकल्पना 'अभिमानाचा मार्ग ' च्या अनुषंगाने जागतिक स्तरावर गुंतवणुकीसाठी एक उदयोन्मुख क्षेत्र म्हणून भारताच्या संरक्षण उद्योगाचा उदय झाला आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये 18 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झालेल्या, चार ठिकाणी आयोजित या पाच दिवसीय कार्यक्रमात 1,340 हून अधिक प्रदर्शकांचा, व्यावसायिकांचा, गुंतवणूकदार, स्टार्ट-अप, एमएसएमई, सशस्त्र सेना आणि अनेक देशांतील प्रतिनिधींचा अभूतपूर्व सहभाग नोंदवला गेला.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वामुळे तीन कामकाजाच्या आणि दोन सार्वजनिक दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांच्या सुरळीत आयोजनांसह डिफएक्स्पोच्या दृष्टीकोनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करता आली आणि संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण कार्यक्षेत्रासाठी सहयोग आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी बळकट व्यासपीठ तयार करण्यात आले. .

डिफएक्स्पो 2022 बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा:

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1870124) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Hindi