जलशक्ती मंत्रालय

अनुपालन ओझे कमी करताना स्वच्छता, सुशासन आणि जीवनमान सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम 2.0


जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा विभागाकडून  विशेष मोहीम 2.0 अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यासाठी 1248  स्थळे निश्चित

Posted On: 21 OCT 2022 3:52PM by PIB Mumbai

 

देशात  2 ऑक्टोबर गांधी जयंती पासून  एक विशेष मोहीम 2.0 सुरू करण्यात आली आहे, ही  मोहीम 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालणार आहे. या मोहीमेअंतर्गत सर्व मंत्रालये/विभाग ,स्वच्छता, सुशासन आणि जीवनमान सुलभतेवर भर देत आहेत आणि अनुपालनाचे ओझे कमी करत आहेत तसेच  सरकारमधील प्रलंबित प्रकरणांचा  निपटारा करून प्रलंबितत प्रकरणांची संख्या  कमी करत आहेत. ही विशेष विशेष मोहीम 2.0  प्रलंबित संदर्भ प्रकरणांचा  वेळेवर निपटारा करणे आणि  कामाची जागा स्वच्छ करण्याचे महत्व बळकट करते. विशेष मोहीम 2.0 ही दोन टप्प्यांत राबवली जात आहे.  14 ते 30 सप्टेंबर पर्यंत तयारीचा टप्पा राबवण्यात आला आणि 2 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत या मोहीमेच्या अंमलबजावणीचा टप्पा सुरु आहे. ही विशेष मोहीम 2.0 खऱ्या भावनेने साजरी  करण्यासाठी,जलशक्ती मंत्रालयाचे जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागांनी  सर्वसमावेशक नियोजन केले आणि  तयारीच्या टप्प्यात मंत्रालय आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधली  स्वच्छता, जागा व्यवस्थापन आणि  सुशोभीकरणाचे निरीक्षण करण्यात आले. तसेच जिथे स्वच्छता मोहीम राबवणे आवश्यक आहे, अशा 1248 जागा निश्चित करण्यात आल्या.

अंमलबजावणीच्या टप्प्यात, माहिती दररोज संकलित केली जात आहे आणि समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रलंबित प्रकारणांच्या निपटाऱ्यासाठी   विशेष मोहीम (एससीडीपीएम ) पोर्टल तयार करण्यात आले आहे.

केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी), केंद्रीय मृदा आणि साहित्य संशोधन केंद्र(सीएसएमआरएस), राष्ट्रीय जल विकास संस्था (एनडब्ल्यूडीए), फरक्का बॅरेज प्रकल्प (एफबीपी),केंद्रीय भूजल मंडळ (सीजीडब्ल्यूबी), जलसंपदा विभाग, राष्ट्रीय गंगा स्वच्छता  अभियान (एनएमसीजी) इत्यादी विविध विभागांनी कार्यालयाच्या आवारात आणि बाहेर स्वच्छता आणि देखभालीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी  'आधी' आणि 'नंतर' अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले आहेत.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869958) Visitor Counter : 142


Read this release in: English , Urdu , Hindi