अर्थ मंत्रालय
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने आयोजित केली विशेष स्वच्छता मोहीम 2.0
महसूल सचीव आणि पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेचा भाग म्हणून रत्नागिरीचा समुद्रकिनारा आणि सीमाशुल्क विभागाच्या तरंगत्या धक्क्यावर राबवली स्वच्छता मोहीम
Posted On:
20 OCT 2022 2:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2022
केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ (सबीआयसी) 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत स्वच्छता विषयक प्रलंबित बाबींची विल्हेवाट लावणे (SCPDM), 2.0 या विशेष मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहे. आतापर्यंत 722 पेक्षा जास्त सार्वजनिक तक्रारी आणि 120 पेक्षा जास्त सार्वजनिक तक्रारी निराकरण न झाल्याचे विनंती अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

सीबीआयसीच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये देशव्यापी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत प्रत्यक्ष स्थळावरील 1,344 मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुपटीहून अधिक आहे.

वर्ष 2021-22 मध्ये, अंदाजे 5.8 लाख फायलींच्या काही भागाचे पुनरावलोकन केले गेले, त्यापैकी अंदाजे. 3.8 लाख फायली शेवटी निकाली काढण्यात आल्या. परिणामी, प्रत्यक्ष फायलींची संख्या अत्यंत कमी राहिली असून त्याचे पुनरावलोकन होत आहे. या वर्षी अंदाजे 64,000 फायलींचे आतापर्यंत पुनरावलोकन करण्यात आले असून त्यापैकी अंदाजे 2,000 फायली निकाली काढण्यात आल्या.

भंगाराची विल्हेवाट लावणे, या आणखी एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वर्ष 2021-22 मध्ये अंदाजे 37,000 चौरस फूट क्षेत्रावरील भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली. या वर्षी सीबीआयसी ने आतापर्यंत अंदाजे 22,000 चौरस फूट क्षेत्र साफ केले असून आणखी काही क्षेत्र मोकळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या विशेष प्रयत्नांचा भाग म्हणून, महसूल सचीव तरुण बजाज, मुख्य आयुक्त एस. एम. टाटा, आणि पुणे विभागाच्या सीजीएसटी आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह ऑक्टोबर 13, 2022 रोजी रत्नागिरीचा समुद्र किनारा आणि सीमाशुल्क विभागाच्या तरंगत्या धक्क्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. या विशेष मोहिमेमुळे समुद्र किनाऱ्यावरचा मोठ्या प्रमाणातला प्लास्टिकचा आणि इतर कचरा साफ झाला.

डीएआरपीजी आणि डीओपीडब्ल्यू चे सचीव व्ही. श्रीनिवास यांनी गुवाहाटी इथल्या जीएसटी भवनाला, विभागीय अधिकाऱ्यांसह भेट दिली आणि विशेष मोहीम 2.0 च्या प्रगतीचा आढावा घेतला. गुवाहाटी इथल्या सीजीएसटी आणि सीमाशुल्क विभागात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता उपक्रमात कार्यालयासाठी अंदाजे 6,000 चौरस फूट अतिरिक्त जागा उपलब्ध झाली. जीएसटी भवन येथे फायली निकाली काढण्याच्या उपक्रमात मुख्य आयुक्त आशुतोष अवस्थी यांच्यासह सचीव आणि वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले.
* * *
G.Chippalkatti/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1869507)
Visitor Counter : 179