अर्थ मंत्रालय

भारती दास यांनी महालेखानियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला

Posted On: 18 OCT 2022 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  ऑक्टोबर  2022

आज दिल्ली इथे भारती दास यांनी नव्या महालेखा नियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला. दास या भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या 27 व्या महालेखा नियंत्रक आहेत.

भारती दास या 1988च्या तुकडीच्या भारतीय सनदी लेखा सेवा अधिकारी आहेत. 18 ऑक्टोबर 2022 रोजी भारत सरकारने त्यांची अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या महालेखानियंत्रक म्हणून नियुक्ती केली.

यापूर्वी दास यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या प्रधान मुख्य महालेखापाल, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रधान मुख्य महालेखानियंत्रक, गृह आणि सहकार मंत्रालयाच्या प्रधान मुख्य महालेखानियंत्रक, आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संचालक, नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि उप सचिव, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालय,अशा विविध पदांवर  जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

महालेखानियंत्रक हे, केंद्र सरकारचे लेखा प्रकरणांसाठीचे ‘मुख्य सल्लागार’ असतात. तांत्रिकदृष्ट्या सबळ लेखा प्रणालीचे व्यवस्थापन आणि केंद्र सरकारचे लेखा परीक्षण करून ते सादर करणे या महालेखानियंत्रकांच्या जबाबदाऱ्या असतात. महालेखानियंत्रक हे सरकारी खजिन्यावर नियंत्रण आणि केंद्र सरकारचे अंतर्गत लेखा परीक्षण देखील करतात.

 

S.Patil/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869011) Visitor Counter : 767


Read this release in: English , Urdu , Hindi