संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डेफएक्स्पो 2022 च्या निमित्ताने , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा रवांडा, आर्मेनिया आणि मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांशी द्विपक्षीय संवाद

Posted On: 18 OCT 2022 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18  ऑक्टोबर  2022

गुजरातमध्ये गांधीनगर येथे आयोजित डेफएक्स्पो 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या  रवांडा, आर्मेनिया आणि मालदीवच्या संरक्षण मंत्र्यांसोबत संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह यांनी 18 ऑक्टोबर 2022 रोजी द्विपक्षीय बैठका घेतल्या. या बैठकांदरम्यान , संरक्षण मंत्र्यांनी  रवांडाचे संरक्षण मंत्री  मेजर जनरल अल्बर्ट मुरासिरा, आर्मेनियाचे संरक्षण मंत्री सुरेन पापिक्यान आणि  मालदीवच्या संरक्षण मंत्री  मारिया अहमद दीदी यांची भेट घेतली.

या बैठकांदरम्यान, संबंधित देशांसोबत परस्पर फायदेशीर सहकार्याचा विस्तार करण्याचे मार्ग शोधण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासह संरक्षण सहकार्याच्या समग्र पैलूंवर चर्चा झाली.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1868946) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Tamil