सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राजस्थानातील अलवर येथे दिव्यांगजनांसाठी ‘सामाजिक अधिकारिता शिबिराचे’ आयोजन

Posted On: 17 OCT 2022 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑक्‍टोबर 2022

 

राजस्थानातील अलवर येथे प्रताप सभागृहात केन्द्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या एडीआयपी योजनेंतर्गत आज 'दिव्यांगजनांना' मदत आणि सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यासाठी ‘सामाजिक अधिकारिता शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. अपंग सक्षमीकरण विभाग (डीईपीडब्लूडी) एएलआयएमसीओ, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग तसेच अलवर जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे शिबिराचे आयोजन केले होते.  

प्रमुख अतिथी, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांच्या हस्ते वितरण शिबिराचे उद्घाटन झाले. राजस्थानचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री टिकाराम जुली यांच्यासह अलवरचे खासदार बालक नाथ, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, शेवटच्या घटकातील माणसाची सेवा करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधानांच्या ध्येयदृष्टीनुसार सरकार काम करत आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यावेळी म्हणाल्या. 

केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींचा अधिकार कायदा 2016 लागू केला. यात आता दिव्यांगांची श्रेणी 7 वरून 21 पर्यंत वाढवण्याची तरतूद केली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये दिव्यांग व्यक्तींचे आरक्षण  3 वरून 5 टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण 3 टक्क्यांवरून 4 टक्के केले आहे. संपूर्ण देशभरात स्विकारली जात असल्याने युनिव्हर्सल आयडी कार्डची योजना दिव्यांग व्यक्तींना होणारी अडचण कमी करेल असे त्यांनी आपल्या मंत्रालयाने केलेल्या कामगिरी आणि कार्याबद्दल बोलताना सांगितले. 

राजस्थान सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री टिकाराम जुली यांनी दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांची माहिती दिली आणि डिजिटायझेशन तसेच ऑनलाइन सुविधांबाबत केलेल्या कामांवर यावेळी प्रकाश टाकला.

अलवरचे खासदार बालक नाथ यांनी त्यांच्या मतदारसंघातील गरजूंना लाभदायक ठरणाऱ्या अशा कल्याणकारी योजना राबवल्याबद्दल केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले.

विविध श्रेणीतील एकूण 2933 सहाय्यभूत वस्तू आणि सहाय्यक उपकरणे यांचे यावेळी विभागवार मोफत वाटप दिव्यांगांना केले जाईल. यांची किंमत 2 कोटी 01 लाख रुपये आहे. अलवरमधील विविध ठिकाणी एएलआयएमसीओने मूल्यांकन शिबिरांचे आयोजन केले होते. यातील 1564 दिव्यांगजनांची यासाठी निवड केली आहे. 

विभाग स्तरावरील मूल्यांकन शिबिरात नोंदणीकृत निवड झालेल्या दिव्यांगजन लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने विविध प्रकारची सहाय्यक उपकरणे वितरित केली जातील. यात 231 मोटार असलेल्या तीनचाकी सायकल, 528 तीनचाकी सायकल, 285 व्हीलचेअर, 834 क्रॅचेस, 340 चालण्यासाठीची काठ्या, 069 स्मार्ट स्टिक, 069 फोन, 37 स्मार्ट केन, 05 ब्रेल किट, 04 सी. पी  चेअर, 170 एमएसआयडी किट, 01 एडीएल किट (कुष्ठरोगासाठी), सेल फोनसह, 212 श्रवणयंत्रे आणि 261 कृत्रिम अवयव तसेच कॅलिपर यांचा समावेश आहे.

अलवरचे जिल्हाधिकारी, डॉ जितेंद्र कुमार सोनी, अलवर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, समाज कल्याण विभाग आणि एएलआयएमसीओचे वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

 

* * *

G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1868478) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu