आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.33 कोटी मात्रा देण्याची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.11 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 26,834

गेल्या 24 तासांत देशात 2,060 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.02%

Posted On: 17 OCT 2022 9:51AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.33 (2,19,33,43,651) कोटींची संख्या पार केली आहे.  

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.11 (4,11,47,585) कोटीहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याची मोहीम देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415330

2nd Dose

10120047

Precaution Dose

7058237

FLWs

1st Dose

18437030

2nd Dose

17718655

Precaution Dose

13720437

Age Group 12-14 years

1st Dose

41147585

2nd Dose

32127377

Age Group 15-18 years

1st Dose

61986688

2nd Dose

53243367

Age Group 18-44 years

1st Dose

561376594

2nd Dose

516157426

Precaution Dose

99462901

Age Group 45-59 years

1st Dose

204043629

2nd Dose

197043851

Precaution Dose

50290967

Over 60 years

1st Dose

127678175

2nd Dose

123197737

Precaution Dose

48117618

Precaution Dose

21,86,50,160

Total

2,19,33,43,651

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 26,834 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे.



परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. 


गेल्या 24 तासांत 1,841 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,40,75,149 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 2,060 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 


गेल्या 24 तासात एकूण 1,10,863 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.86  (89,86,99,680) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.02% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.86% इतका आहे. 


***

Gopal C/Sampada P/CYadav


(Release ID: 1868424) Visitor Counter : 206