आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील एकूण कोविड- 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या व्याप्तीने 219.27 कोटी मात्रांची संख्या केली पार


12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 4.11 कोटीहून अधिक पहिल्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 26,618

गेल्या 24 तासांत, 2,430 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.07%

Posted On: 15 OCT 2022 9:51AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त  तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 219.27 कोटी (2,19,27,15,971)  कोटी मात्रांची संख्या  पार केली आहे.

16 मार्च 2022 पासून 12 ते  14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.11 कोटींहून अधिक (4,11,33,467) किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.

सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415312

2nd Dose

10119959

Precaution Dose

7055227

FLWs

1st Dose

18437011

2nd Dose

17718480

Precaution Dose

13714557

Age Group 12-14 years

1st Dose

41133467

2nd Dose

32092600

Age Group 15-18 years

1st Dose

61982511

2nd Dose

53227865

Age Group 18-44 years

1st Dose

561369711

2nd Dose

516126712

Precaution Dose

99151551

Age Group 45-59 years

1st Dose

204042405

2nd Dose

197037497

Precaution Dose

50164995

Over 60 years

1st Dose

127677093

2nd Dose

123192811

Precaution Dose

48056255

Precaution Dose

21,81,42,543

Total

2,19,27,15,971

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 26,618  इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.06% टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.76% इतका आहे. गेल्या 24 तासांत, 2,378 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,70,935 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत 2,430 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत,  2,41,707  कोविड-19  चाचण्या भारतात करण्यात आल्या  असून  एकूण चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 89.83  कोटींहून अधिक   (89,83,57,195) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.07%  इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.01% आहे.

****

HansrajR/B.Sontakke/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1867985) अभ्यागत कक्ष : 192