शिक्षण मंत्रालय

आयआयटी म्हणजे ज्ञान आणि अनुभवाचे भांडार तसेच भविष्याशी जोडणारा पूल - धर्मेंद्र प्रधान


सर्व आयआयटीज मधील संशोधन आणि विकास नवोन्मेष प्रकल्पांच्या पहिल्यांदाच भरवण्यात आलेल्या इन्व्हेंटिव्ह (IInvenTiv) या प्रदर्शनाचे धर्मेंद्र प्रधान यांनी केले उद्‌घाटन

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने 23 आयआयटीचे एकूण 75 प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत

Posted On: 14 OCT 2022 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14  ऑक्टोबर  2022

दिल्ली येथील  भारतीय तंत्रज्ञान संस्थेत भरवण्यात आलेल्या सर्व आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान  संस्थांच्या संशोधन आणि विकास नवोन्मेष प्रकल्पांच्या  इन्व्हेंटिव्ह (IInvenTiv) या प्रदर्शनाचे उदघाटन, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री आणि इन्व्हेंटिव्ह (IInvenTiv) चे मुख्य आश्रयदाते   धर्मेंद्र प्रधान यांनी आज केले. या दोन दिवसीय प्रदर्शनाचा 15 ऑक्टोबर रोजी समारोप होणार असून   भारताची जागतिक संशोधन आणि विकासाचे  सामर्थ्य  दाखवण्यासाठी शैक्षणिक आणि उद्योगांना एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणण्यात आले आहे. प्रधान यांच्या हस्ते यावेळी इन्व्हेंटिव्ह (IInvenTiv) संदर्भातील  एका माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रदर्शन कक्षांना भेट दिली.

आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  ‘जय अनुसंधान ’ या मंत्राची साक्ष देणाऱ्या या ऐतिहासिक-पहिल्या कार्यक्रमाचा भाग झाल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना आनंद व्यक्त केला. आयआयटी या आता केवळ भारतीय तंत्रज्ञान संस्था राहिलेल्या नाहीत, तर आज त्या परिवर्तनाची साधने बनल्या आहेत, असे ते म्हणाले. आयआयटी या  ज्ञान आणि अनुभवाचे भांडार असून  भविष्याशी जोडणारा पूल  आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 आपल्या आयआयटींना केवळ अभियांत्रिकी महाविद्यालये असण्याच्या पलीकडे जावे लागेल. प्लेसमेंट पॅकेजच्या आधारे आयआयटीचे मापदंड ठरवणे  थांबवावे लागेल.आयआयटीने  बाजारात आणलेल्या नवोन्मेषांची संख्या, नवोन्मेषांद्वारे केलेली  कमाई आणि या माध्यमातून झालेली रोजगार निर्माण करणाऱ्यांची संख्या यावर मानके आणि मापदंडांची व्याख्या पुन्हा ठरवली पाहिले असे प्रधान यांनी सांगितले. भारतातील  प्रतिभा, डिजिटल-प्रथम हा दृष्टीकोन, बाजारपेठेचा आकार, उदयोन्मुख क्रयशक्ती आणि वाढत्या आकांक्षा हे भारताला अभूतपूर्व गतीने आणि मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्यासाठी एक उत्कृष्ट मिश्रण आहे, आपल्या  आयआयटीजनी  या संधीचे सोने केले पाहिजे, असे प्रधान यांनी सांगितले.

अमृत काळात, संशोधन -नेतृत्वाखालील भारत तळागाळातील नवोन्मेषला चालना देईल आणि त्यात सर्वांचा, विशेषत: ग्रामीण क्षेत्राचा सहभाग असेल, असे प्रधान यांनी नमूद केले.इन्व्हेंटिव्ह (IInvenTiv) ही एक अशा क्रांतीची सुरुवात असेल आणि जटिल जागतिक समस्यांवर उपाय देणारा एक महत्त्वाचा मंच म्हणून उदयाला येईल.

स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव उपक्रमाच्या अनुषंगाने भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने संशोधन आणि विकास मेळा आयोजित केला जात आहे. स्टार्टअप्ससह, सरकार आणि दूतावासातील अधिकारी आणि जगातील आयआयटीचे माजी विद्यार्थी यासह उद्योग क्षेत्रातील  300 हून अधिक प्रतिनिधीनी यात सहभागी होणार आहेत . त्याशिवाय, संपूर्ण कार्यक्रमात सुमारे 1500 जणांची उपस्थितांची उपस्थिती अपेक्षित आहे, यात  विविध संस्थांमधील प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधन तज्ज्ञांचा समावेश आहे.

या प्रदर्शनात विविध संकल्पनांवर आधारित 75 प्रकल्प आणि 6 प्रदर्शनीय प्रकल्प मांडण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1867858) Visitor Counter : 157