युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नाडा(एनएडीए) आणि एनडीटीएल 12 ते 14 ऑक्टोबर 2022 दरम्यान भारतात प्रथमच “वाडा(डब्ल्यूएडीए) ऍथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवाद- 2022” आयोजित करणार


केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर उद्‌घाटन सत्राला संबोधित करतील

Posted On: 11 OCT 2022 5:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11  ऑक्टोबर  2022

राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संस्था (नाडा ) आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळा (एनडीटीएल )  12 ते 14 ऑक्टोबर 2022 दरम्यान  नवी दिल्ली येथे वाडा(डब्ल्यूएडीए)  ऍथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट  परिसंवाद- 2022 चे आयॊजन करणार आहे. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर या परिसंवादाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील.

पहिला वाडा ऍथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवाद  कतारमधील दोहा  येथे नोव्हेंबर 2015 मध्ये अँटी-डोपिंग लॅब कतार (ADLQ) द्वारे आयोजित करण्यात आला होता. दुसरा वाडा ऍथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवाद 2018 मध्ये इटलीतील रोम येथे इटालियन फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन द्वारे आयोजित करण्यात आला होता. तिसरा वाडा ऍथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवाद प्रथमच भारतात आयोजित करण्यात आला आहे.  या परिसंवादात 56 देशांतील 200 हून अधिक स्पर्धक, जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संस्था (WADA) चे अधिकारी, विविध राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटना , ऍथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट्स आणि डब्ल्यूएडीए मान्यताप्राप्त प्रयोगशाळाचे प्रतिनिधी आणि तज्ञ यात  सहभागी होत आहेत.

या परिसंवादात प्रामुख्याने  ऍथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट मधील अलीकडील कल, यश आणि आव्हाने, स्टिरॉइडल मॉड्यूलवर परिणाम करणाऱ्या  संभ्रमात टाकणाऱ्या घटकांचे व्यवस्थापन , ऍथलीट बायोलॉजिकल पासपोर्टसाठी विकसित होत असलेली धोरणात्मक चाचणी इत्यादीवर  चर्चा होईल  आणि , ऍथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट्सच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातून डोपिंगचा  शोध आणि निर्मूलनासाठी कार्य करण्यास डब्ल्यूएडीएला मदत करेल.

 

 

 

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866879) Visitor Counter : 229


Read this release in: English , Gujarati , Urdu , Hindi