वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची व्यावसायिकांना आणि नागरिकांना व्यवसाय सुरू करताना आणि चालवताना येणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्याची सूचना
MyGov च्या सर्जनशील व्यासपीठावर अभिप्राय पाठवण्याची मोहीम 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरू राहील
Posted On:
07 OCT 2022 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2022
भारत सरकार देशभरात व्यवसाय सुलभ करणे आणि राहणीमान सुधारण्यासाठी वचनबद्ध आहे. सरकारतर्फे व्यावसायिकांशी आणि नागरिकांशी संवाद सुधारण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. व्यवसाय करण्यास सुलभता आणि राहणीमान सुलभ करण्यासाठी, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग व्यवसाय सुरू करण्याच्या आणि चालवण्याच्या समस्यांवर व्यावसायिक आणि नागरिकांकडून सूचना मागवत आहे.यात वेगवेगळ्या तरतुदी अंतर्गत किंवा विभागांखालील कोणतेही किरकोळ उल्लंघन गुन्हेगारी म्हणून ठरवले जाऊ शकते. जगभरातील गुंतवणूकदारांसाठी ‘नवीन भारत’ हे गुंतवणुकीचे एक पसंतीचे ठिकाण बनवणे आणि अंतिम लाभार्थीपर्यंत कोणतीही अडचणमुक्त सेवा देणे सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश आहे. ही सूचना मोहीम 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत MyGov च्या सर्जनशील व्यासपीठावर उपलब्ध आहे.
मोहिमेची लिंक: https://innovateindia.mygov.in/suggestion-box/
खालील काही अशी विस्तृत क्षेत्रे आहेत ज्याकडे व्यवसाय सुलभता आणि राहणीमान सुधारण्यासाठी अनुकूल म्हणून पाहता येईल:
- परवानग्या, मंजुरी मिळवणे
- प्रमाणपत्रांचे,परवान्यांचे नूतनीकरण
- किरकोळ गुन्ह्यांचे निर्दोषीकरण
- भरणा / परतावा
- तपासणी/ लेखापरीक्षण
- ऑनलाइन व्यवस्था/ प्रक्रिया
- नोंदणी करणे आणि त्याचा हिशोब ठेवणे
- प्रोत्साहन निधीसाठी अर्ज करणे
- देय प्रोत्साहन निधी
- संबंधित प्रक्रिया
- देयक यंत्रणा
- इतर
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865938)
Visitor Counter : 209