आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड - 19 लसीकरण मोहिमेची व्याप्ती 218.88 कोटी मात्रांपर्यंत वाढली


12 ते 14 या वयोगटातील बालकांना 4.10 कोटी पहिल्या मात्रा देण्यात आल्या

देशातील उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या आता 30,362

गेल्या 24 तासांत 1,997 नवे रुग्ण आढळले

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 1.34 टक्के

Posted On: 07 OCT 2022 9:33AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.88 (2,18,88,17,589) कोटींची संख्या ओलांडली आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,55,105)  कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वाढवणारी वर्धित लसमात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415245

2nd Dose

10119287

Precaution Dose

7038020

FLWs

1st Dose

18436898

2nd Dose

17717246

Precaution Dose

13675366

Age Group 12-14 years

1st Dose

41055105

2nd Dose

31868048

Age Group 15-18 years

1st Dose

61954847

2nd Dose

53122655

Age Group 18-44 years

1st Dose

561313445

2nd Dose

515923815

Precaution Dose

97222916

Age Group 45-59 years

1st Dose

204036026

2nd Dose

196996958

Precaution Dose

49400711

Over 60 years

1st Dose

127673150

2nd Dose

123163413

Precaution Dose

47684438

Precaution Dose

21,50,21,451

Total

2,18,88,17,589

 

 भारतातील रुग्णसंख्या सध्या 30,362 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.07 टक्के इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. गेल्या 24 तासांत 3,908 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून) वाढून 4,40,47,344 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,997 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 2,13,123 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.64 (89,64,81,387) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.34 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.94 टक्के इतका आहे.

***

Samarjit T/Bhakti S/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1865742) Visitor Counter : 182