वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय गुणवत्ता परिषद आपला रौप्य महोत्सव साजरा करणार;  या सोहळ्याला पियुष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

Posted On: 05 OCT 2022 9:02PM by PIB Mumbai

 

भारतीय गुणवत्ता परिषदेने गुणवत्तेप्रति भारताची वचनबद्धता साजरी करण्यासाठी गुणवत्ता से आत्मनिर्भरतामोहीम सुरू केली

भारतीय गुणवत्ता परिषद उद्या नवी दिल्लीतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे विशेष कार्यक्रमाद्वारे आपला रौप्य महोत्सव  साजरा करणार आहे.  गुणवत्ता उंचावत  भारताने साधलेली  प्रगती सामायिक करणे हा यामागचा उद्देश आहे. गुणवत्ता आणि सातत्यामध्ये मूळ असलेल्या भारताच्या उत्कृष्टतेची प्रशंसा करण्यासाठी  धोरणनिर्मिती,प्रशासन आणि गुणवत्तेतील दिग्गज एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री  सुरेश प्रभू, जी-20 मधील भारताचे प्रतिनिधी  अमिताभ कांत, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव  अनुराग जैन, आणि भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि माजी वाणिज्य सचिव  बी. व्ही. आर सुब्रह्मण्यम आणि इतर मान्यवर या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात 'मेक इन इंडिया'ला सक्षम बनवणारी गुणवत्ता परिसंस्था, वेग, व्याप्ती , डिजिटलायझेशन आणि गुणवत्ता याद्वारे 2047 साठी भारताच्या विकासाचे स्वप्न साकार करणे आणि 'हील इन इंडिया-हील बाय इंडिया' उपक्रमावर चर्चा होणार आहे . भारताच्या गुणवत्ता  परिसंस्थेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1865452) Visitor Counter : 238


Read this release in: English , Urdu , Hindi