आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण
शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी स्थापन तज्ज्ञ समितीने आय एफ एस सी ए ला सादर केला अहवाल
Posted On:
05 OCT 2022 2:37PM by PIB Mumbai
आय एफ एस सी ए अर्थात आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरणाने शाश्वत अर्थव्यवस्थेबाबत स्थापन केलेल्या तज्ञांच्या समितीन आपला अंतिम अहवाल आय एफ एस सी ए अध्यक्षांकडे 3 ऑक्टोबर 2022 रोजी सादर केला आहे. भारत सरकारचे पर्यावरण, वन आणि पर्यावरण बदल मंत्रालयाचे माजी सचिव सी के मिश्रा हे या समितीच्या अध्यक्षपदी होते या समितीत संपूर्ण शाश्वत आर्थिक परिक्षेत्राचे नेते आणि तज्ञांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था सहभागी होत्या. याबद्दल अधिक माहिती पुढील लिंकच्या माध्यमातून पाहता येईल
https://ifsca.gov.in/IFSCACommittees
आय एफ एस सी च्या नियमांचं एकत्रीकरण करत आंतरराष्ट्रीय पद्धती एकवटणे, आय एफ एस सी च्या माध्यमातून गुंतवणुकीचा ओघ वाढवणे तसंच हरित आणि शाश्वत अर्थव्यवस्थेत नाविन्यपूर्ण आर्थिक उत्पादनांच्या विकासासाठी सहाय्य करणे याचाही समावेश होता. हरित आणि शाश्वत अर्थव्यवस्थेची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीकोनातून निगडीत उत्पादने, धोरण आणि नियम, क्षमता बांधणी या सारख्या पैलूंबाबत तज्ञ समितीनं शिफारसी सादर केल्या आहेत.
ऐच्छिक कार्बन मार्केटचा विकास, संक्रमण रोख्यांची रचनात्मक मांडणी, जोखीम मुक्त यंत्रणा सक्षम करणे, रेग्युलेटरी सेंडबॉक्स अर्थात ग्राहकोपयोगी नाविन्यपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि इतर बाबींसोबतच जागतिक पर्यावरण एकत्रीकरणासाठी प्रोत्साहन देणे यासारख्या काही महत्त्वाच्या शिफारसीचा यात समावेश आहे. एम एस एम इ अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचं देशाच्या आर्थिक विकासातलं महत्त्व लक्षात घेऊन शाश्वत कर्जांसाठी एम एस एम ई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी एक पूर्णपणे समर्पित एम एस एम इ प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रस्तावही समितीन ठेवला आहे. तसंच आपत्ती रोखे, महापालिका रोखे, हरित सुरक्षा, मिश्र अर्थव्यवस्था यासारख्या सृजनशील बाबींच्या निर्मितीची शिफारसही समितीने केली आहे आय एफ एस सी मध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढण्याच्या हेतून एकत्रीकरणाच्या सुविधा वाढवण्, निधींचे परिणाम आणि ग्रीन इक्विटी यावर समितीन विविध शिफारसींच्या माध्यमातून भर दिला आहे. यासोबतच आर्थिक प्रणालीच्या हरितकरणाचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने आय एफ एस सी एन क्षमता बांधणीच्या उद्देशाने महत्वपूर्ण भूमिका बजावावी अशी शिफारसही केली आहे.
या समितीचे अध्यक्ष सी के मिश्रा यांनी अहवाल सादर करतानाच जगभरातल्या देशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल आय एफ एस सी ए बाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. जगाच्या सर्व स्तरातून आलेले समिती सदस्य आणि शिफारसी ज्यावर आधारित आहेत असं भव्य व्यासपीठ उपलब्ध केल्याने आय एफ एस सी ए ने जे प्रयत्न हाती घेतले आहेत त्याला चांगली सुरुवात होऊन शाश्वत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य निष्पत्ती होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
समितीतल्या तज्ञांच्या सर्वसमावेशक शिफारसी बद्दल आयएफएससीच्या अध्यक्षांनी समिती सदस्यांचे आभार मानले आहेत तसंच आयएफएससीन शाश्वत अर्थव्यवस्थेशी निगडित राहण्याचं महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं आहे. या तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल दूरगामी परिणाम घडवून आणत भारताच्या शून्य कार्बन उत्सर्जनाच्या कटीबद्ध्तेसाठी तसच आंतरराष्ट्रीय स्तरावर भांडवलाच्या सुसुत्रीकरणाच्या माध्यमातून गिफ्ट आयएफएससी म्हणून उदयाला येईल असं ते म्हणाले. या समितीने चा अहवाल खालील वेब लिंक वर उपलब्ध आहे :-.
https://ifsca.gov.in/CommitteeReport
***
A.Chavan/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865322)
Visitor Counter : 344