सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा दिल्ली हाट इथे स्फूर्ति मेळ्याला दिली भेट
28 राज्यांतले सुमारे100 कलाकार स्फूर्ति मेळाव्यात सहभागी
Posted On:
04 OCT 2022 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा यांनी, एमएसएमई सचिव बी बी स्वाईन यांच्या समवेत नवी दिल्लीत आज आयएनए दिल्ली हाट इथे स्फूर्ति (SFURTI)म्हणजेच, पारंपरिक उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठीची निधी योजना-अंतर्गत सुरु असलेल्या मेळाव्याला भेट दिली. यावेळी त्यांनी कलाकारांशी संवादही साधला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 1 ते 10 ऑक्टोबर दरम्यान, स्फूर्ति मेळा, म्हणजेच स्फूर्ति क्लस्टरमधील पारंपारिक उत्पादनांचे राष्ट्रीय स्तराचे प्रदर्शन प्रथमच आयोजित केले जात आहे.
समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कला तसेच सांस्कृतिक वारसा असलेल्या देशाचे आपण नागरीक आहोत असे वर्मा यांनी सांगितले. कलाकारांसाठी विक्रीचे नवे मार्ग खुले करणे हा या स्फूर्ति मेळ्याचा उद्देश आहे, असेही वर्मा यांनी यावेळी म्हटले.
या मेळ्यात कलाकारांना जो वाव मिळत आहे, त्यामुळे उत्पादनांत वैविध्य आणण्यात आणि व्यवसाय वाढविण्यात त्यांना प्रोत्साहन मिळेल, असे मत, एमएसएमई विभागाचे सचिव बी बी स्वाईन यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यात देशाच्या विविध भागातील समृद्ध अशा लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.
* * *
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865216)
Visitor Counter : 176