संरक्षण मंत्रालय
आणखी पाच छावणी मंडळांमध्ये ऑनलाइन इमारत योजना मंजूरी प्रणालीचा (ओबीपीएएस) विस्तार
Posted On:
04 OCT 2022 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
आग्रा, रानीखेत, बबिना, जम्मू आणि कन्नोर या पाच छावणी मंडळांमध्ये ई - छावणी पोर्टल अंतर्गत ऑनलाइन इमारत योजना मंजूरी प्रणालीचा (ओबीपीएएस ) विस्तार करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. या छावण्यांमधील इमारत योजनेच्या छाननी प्रक्रियेत यामुळे वेग, अचूकता, सातत्य आणि पारदर्शकता आणखी वाढेल. या विस्तारामुळे, ओबीपीएएस अंतर्गत लाभ आता देशभरातील 22 छावणी मंडळांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मिळू शकतात.
प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि अनुपालन ओझे कमी करण्यासाठी, ओबीपीएएसने छावणी मंडळांमध्ये दाखल करण्याचा अर्ज आणि प्रक्रिया प्रमाणित केली आहे.रहिवाशांना पूर्वी 10 दस्तऐवज अपलोड करावे लागत असत आता केवळ चार दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे.याशिवाय, इमारतीच्या योजनेच्या मंजुरीच्या प्रक्रियेत , नागरी क्षेत्राबाहेरील जुन्या अनुदानाच्या मालमत्तेच्या बाबी वगळता आधी क्षेत्रीय तपासणी करण्याची अनिवार्य तरतूद काढून टाकण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीच्या योजनेवर बांधकाम स्थानानुसार (नागरी क्षेत्राच्या आत किंवा बाहेर) 2 दिवस ते 11 दिवसांच्या कालावधीत प्रक्रिया केली जाईल.
* * *
G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865210)
Visitor Counter : 150