गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे एका जाहीर सभेला केले संबोधित

Posted On: 04 OCT 2022 8:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शहा यांनी आज जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. त्या आधी नवमीच्या शुभ प्रसंगी अमित शहा यांनी वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेऊन पूजा अर्चना केली  आणि देशाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कलम 370 हटवल्यास जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार होईल असा दावा करणाऱ्यांना राजौरीतील ही भव्य सभा  प्रत्युत्तर आहे, असे अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेले इथल्या  लोकांचे अपार प्रेम आणि विश्वास सरकारला जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या कल्याणासाठी काम करण्यास प्रोत्साहित करते, असे ते म्हणाले. पहाडी आणि गुर्जर-बकरवाल समाजाचे लोक भारताच्या रक्षणासाठी नेहमीच एका मजबूत न ढळणाऱ्या खडकासारखे उभे राहिले आहेत आणि अशा सुरक्षिततेची अभेद्य भिंत अस्तित्वात असल्याच्या भरवशावर  सर्व भारतीय शांतपणे झोपतात, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नायब राज्यपाल  मनोज सिन्हा यांनी महाराजा हरिसिंह  यांचा जन्मदिवस शासकीय सुट्टी म्हणून घोषित करून यांच्या योगदानाचे स्मरण करण्याचे कार्य केले आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशाच्या विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असे ते म्हणाले. 70 वर्षे, तीन कुटुंबांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज्य केले आणि त्यांच्या कुटुंबापुरती  लोकशाही मर्यादित केली.पण, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 2014 मध्ये पंचायत निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यानंतर 2019 मध्ये तालुका  आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यात आल्या आणि आता जम्मू आणि काश्मीरचा कारभार, जो आधी तीन कुटुंबांपुरता  मर्यादित होता, आता तो 30 हजार लोकांकडे आहे, असे शाह यांनी सांगितले.  

पंतप्रधान मोदी यांनी  5 ऑगस्ट 2019 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि कलम 370 आणि 35 ए  हटवले, असे अमित शाह म्हणाले. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मागासवर्ग, दलित, आदिवासी आणि पहाडी लोकांना त्यांचे हक्क मिळाले आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी लोकशाही तीन घराण्यांपुरती  मर्यादित न ठेवता आता  30 हजार लोक त्याचा भाग आहेत हे सुनिश्चित केल्याने  आता लोकांचे हक्क कोणीही दाबू शकत नाही, असे गृहमंत्री म्हणाले. कलम 370 रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी  लवकरात लवकर निवडणुका होतील असे आश्वासन दिले होते आणि त्यासाठी मतदार संघांची पुनर्रचना  आवश्यक होती. पूर्वीची मतदारसंघाची पुनर्रचना निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार करण्यात आली नव्हती , तर केवळ तीन कुटुंबांना लाभ देण्यासाठी करण्यात आली होती, मात्र आता स्वातंत्र्यानंतर प्रथमच  मतदारसंघाची पुनर्रचना योग्य पद्धतीने  पूर्ण झाली असून डोंगराळ भागात जागा वाढवण्यात आल्या आहेत. मतदारसंघांची पुनर्रचना  प्रक्रिया सुरू करून पंतप्रधान मोदी यांनी राजौरी, पुंछ, डोडा आणि किश्तवाडमधील लोकांना न्याय मिळवून दिला आहे, असे शाह यांनी सांगितले.  तिन्ही कुटुंबांनी आपल्या राजवटीत भ्रष्टाचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, मात्र पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरमधील 27 लाख कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देत आहेत, या सुविधा  या तीन कुटुंबांनी गेल्या 70 वर्षांत कधीच दिल्या नाहीत कारण ते भ्रष्टाचारी होते आणि दिल्लीतून येणारा पैसा हडप करत होते, असे ते म्हणाले. 

भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती करण्यात आली आहे , व्हिसलब्लोअर कायदा लागू करण्यात आला आहे , उमंगच्या माध्यमातून मोबाइलद्वारे तक्रार नोंदवण्यास सुरुवात करण्यात आली आहे , 'सतर्क नागरिक ' मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे , दक्षता कार्यालये उघडण्यात आली आहेत आणि इलेक्ट्रॉनिक व्हिजिलन्स क्लिअरन्स प्रणालीही स्थापित करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.  जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटन हा रोजगाराचा सर्वात मोठा स्त्रोत आहे आणि जानेवारी 2022 पासून आजपर्यंत 1.62 कोटी पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली आहे, ही संख्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमधली  सर्वाधिक संख्या आहे.पर्यटनामुळे पूंछ, राजौरी, जम्मू आणि खोऱ्यासह जम्मू आणि काश्मीरमधील विविध प्रदेशांमध्ये सर्वाधिक रोजगार निर्माण झाला आहे, असे शाह यांनी सांगितले.

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865206) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Assamese