भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगाने काही सुधारणांसह झी इंटरटेनमेंट इंटरप्राईजेस लिमिटेड आणि बांगला इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा, कल्व्हर मॅक्स इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विलय करण्यास दिली मंजुरी
Posted On:
04 OCT 2022 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2022
भारतीय स्पर्धा आयोगाने काही सुधारणांसह झी इंटरटेनमेंट इंटरप्राईजेस लिमिटेड आणि बांगला इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा (बीईपीएल) कल्व्हर मॅक्स इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (सीएमई) विलय करण्यास मंजुरी दिली आहे.
प्रस्तावित विलय (i) झी इंटरटेनमेंट इंटरप्राईजेस लिमिटेड आणि बांगला इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या दोन्हीचा सीएमई मध्ये विलय, आणि (ii) काही समभाग सनब्राईट इंटरनॅशनल होल्डींग लिमिटेडला (पूर्वीची एस्सेल होल्डिंग्ज लिमिटेड) आणि सनब्राईट मॉरीशस इन्वेस्टमेंट लिमिटेडला प्राधान्याने देणे.
हे प्रस्तावित एकीकरण कंपनी कायदा, 2002 च्या कलम 5(a) आणि 5(c)च्या तरतुदींनुसार आहे.
सीएमई ही अप्रत्यक्षपणे सोनी ग्रुप कॉर्पोरेशन (एसजीसी)ची पूर्ण स्वामित्वाची उपकंपनी आहे. सीएमईच्या भारतात अनेक मनोरंजन, चित्रपट, क्रीडा आणि बाल मनोरंजन वाहिन्या आहेत. सोनीलिव्ह ही सीएमईची डिजिटल मनोरंजन व्हिडिओ सेवा आहे, जी भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ओटीटी सेवा प्रदान करते. भारतात सीएमईचे 700 दशलक्ष प्रेक्षक आहेत आणि ही वाहिनी 167 देशांत उपलब्ध आहे. बीईपीएल ही देखील एसजीसीची अप्रत्यक्षपणे सोनी ग्रुप कॉर्पोरेशन (एसजीसी)ची पूर्ण स्वामित्वाची उपकंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय चित्रपटाचे अधिकार विकत घेणे, इव्हेंट आणि ईतर दूरचित्रवाणी कंटेंट विकत घेणे तसेच या दूरचित्रवाणी कंटेंटच्या प्रसारणासाठी जाहिरातींच्या माध्यमातून महसूल जमा करणे हा आहे.
झी ही एक मिडिया आणि मनोरंजन कंपनी आहे. जी 190 पेक्षा जास्त देशांत प्रसारण, दिजीतक कंटेंट, चित्रपट, संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण या क्षेत्रात आहे. झी ही मुंबई शेयर बाजारात आणि राष्ट्रीय शेयर बाजारात सूचिबद्ध कंपनी आहे.
आयोगाने आपल्या नियम 25 (1) च्या अधीन राहून या प्रस्तावित सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. आयोगाचे सविस्तर आदेश लवकरच येतील.
* * *
G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865199)
Visitor Counter : 208