संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अंदमान-निकोबार कमांडमध्ये हिन्दी पखवाडा साजरा

प्रविष्टि तिथि: 04 OCT 2022 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022


अंदमान-निकोबार इथल्या सैन्य मुखालयात सप्टेंबर महिन्यात हिन्दी पखवाड्याचे म्हणजेच पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिन्दीचा अधिकृत भाषा म्हणून वापर वाढवण्यासाठी जनजागृती व्हावी यादृष्टीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. अंदमान आणि निकोबार मुख्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व कार्यालयांमध्ये या दरम्यान विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.  

यावेळी, निबंध स्पर्धा, हिन्दी नोटिंग आणि ड्राफ्टिंग, काव्यवाचन, वादविवाद स्पर्धा, सामान्यज्ञान स्पर्धा, भाषा- शब्द ज्ञान स्पर्धा अशा स्पर्धामध्ये अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

अंदमान-निकोबारच्या सैन्य मुख्यालयाच्या चार शाखा (लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दल) कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दैनंदिन संभाषणात हिन्दीचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले. यावेळी विजेत्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.


* * *

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1865183) आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी