कृषी मंत्रालय

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (आयवायओएम) - 2023 ला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आणि कृषक कल्याण विभाग आणि नाफेड यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 04 OCT 2022 3:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्‍टोबर 2022

 

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष - 2023 साजरे करण्याच्या दृष्टीने, भरड धान्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून आखण्यात आलेल्या उपक्रमांना चालना देण्याच्या अनुषंगाने, कृषी आणि कृषक कल्याण विभाग आणि भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ मर्यादित -  नाफेड, यांच्यातील सामंजस्य करारावर काल नवी दिल्ली इथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांसमोर प्रस्तावित केलेला आणि जगभरात साजरा होणारा  “आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (आयवायओएम) - 2023” हा उपक्रम लक्षात घेऊन, भरड धान्य - आधारित उत्पादनांच्या प्रचार आणि विपणनासाठी दोन्ही संस्था एकत्र काम करतील, या अनुषंगाने हा करार करण्यात आला आहे. जगभरात भरड धान्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत तयारी करत असून देशभरातील भरड धान्यावर आधारित उत्पादनांच्या वापरात जास्तीत जास्त वाढ करण्याच्या दृष्टीने, या दोन्ही संस्था भरड धान्य - आधारित उत्पादनांना पाठबळ देतील, व्यवस्थापन, प्रचार करतील आणि बाजारपेठा उपलब्ध करून देतील.

कृषी आणि कृषक कल्याण विभाग आणि नाफेड, मूल्यवर्धित भरड धान्यांशी संबंधित उत्पादने विकसित करण्यासाठी, भरड धान्य - आधारित उत्पादनांच्या उत्पादकांना / प्रक्रिया करणाऱ्यांना सल्लागार पाठबळाची सुविधा देण्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सहयोग करतील; भारतीय भरड धान्य संशोधन संस्थेशी – आयआयएमआरशी संलग्न असलेल्या स्टार्ट अप्ससह इतर स्टार्ट अप्सचा समावेश करणे ;  विशेषत: भरड धान्य - आधारित उत्पादनांची श्रेणी विकसित करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था तयार करणे; नाफेड बाजार स्टोअर्स आणि नाफेडशी संलग्न इतर संस्थांच्या जाळ्यामार्फत भरड धान्य - आधारित उत्पादनांचा प्रचार आणि विक्री तसेच दिल्ली - एनसीआरमधील विविध ठिकाणी बाजरी-आधारित वेंडिंग मशीन्सची स्थापना; भरड धान्य - आधारित उत्पादनांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने यावर आधारित उत्पादनांचे वितरण करण्यासाठीही यामुळे मदत होणार आहे. 


* * *

M.Pange/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865066) Visitor Counter : 344


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu