राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 02 OCT 2022 9:20PM by PIB Mumbai

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे:-

दुर्गापूजेच्या या शुभप्रसंगाच्या निमित्ताने, मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांचे अभिष्टचिंतन करते.

माता दुर्गा ही शक्ती स्वरूप आहे आणि हा सण म्हणजे स्त्री शक्तीबद्दल आदर व्यक्त करण्याची सुसंधी आहे.ज्या समाजात खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाला प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिले जाते, तो समाज आधुनिक,विकसित आणि न्याय्य समाज मानला जाऊ शकतो.देवी दुर्गेची नऊ रूपे निसर्गमातेच्या असीम शक्तीचे प्रतीक आहेत.

दुर्गापूजेच्या उत्सवाद्वारे आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना दृढ व्हावी,अशी आकांक्षा मी प्रकट करत आहे.आपण असा समाज घडवूया, जिथे महिलांचा अधिकाधिक आदर केला जाईल आणि त्या राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत समान योगदान देऊ शकतील.

मी जगतजननी दुर्गामातेला प्रार्थना करते,की तिने आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावेत आणि सर्व देशवासियांना सुख आणि समृद्धीचे जीवन लाभावे.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

***

S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864598)