नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सर्बानंद सोनोवाल यांनी वाहिली गांधी जयंती निमित्त महात्मा गांधींना श्रद्धांजली

प्रविष्टि तिथि: 02 OCT 2022 9:10PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुवाहाटी इथे गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी त्यांनी विद्यार्यांशी संवाद साधला आणि त्यांना खादीच्या कपड्यांचे वितरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी व्होकल फॉर लोकलचा नारा दिला आहे, त्याचाच एक भाग म्हणून हे वितरण करण्यात आले.

महात्मा गांधींनी जो नारा दिला होता, ‘स्वच्छता ही सेवा’, त्यानुसार आपण देशाची तसेच मानवतेची केली पाहिजे. नरेन्द्र मोदींच्या समर्पित आणि कटिबद्ध प्रयत्नांतून देशात रामराज्य बघण्याचे बापूंचे स्वप्न साकार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिक आणि मनापासून प्रयत्न करत आहेत त्यामुळे लोकांना आता रामराज्याचा अनुभव येत आहे. एक सशक्त, स्वतंत्र आणि अभिमानास्पद राष्ट्र निर्मितीच्या या महान कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो, सोनोवाल म्हणाले.

 

***

S.Bedekar/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1864596) आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी