संरक्षण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारतीय नौदल प्रमुख, एडीएम, आर.हरी कुमार यांची न्यूझीलंडला भेट
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                02 OCT 2022 8:21PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
भारतीय नौदल प्रमुख, एडीएम आर. हरी कुमार, (CNS), यांनी 29 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 22 या कालावधीत न्यूझीलंडला भेट दिली.
रॉयल न्यूझीलंड नेव्ही (RNZN)यांच्या नेतृत्वाअंतर्गत ते तौआ मोआना मारे येथे आयोजित केलेल्या पारंपरिक पोवहिरी समारंभात नौदल प्रमुखांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आणि नौदलाच्या मैदानावर त्यांना समारंभपूर्वक मानवंदना  देण्यात आली .
या भेटीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘व्हाईट शिपिंग’बद्दलच्या माहिती संदर्भातील करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सामायिक सागरी क्षेत्रामध्ये  दक्षता अधिक वाढविण्याच्या दिशेने सहकार्य करत दोन्ही देशांतील सागरी क्षेत्रामध्ये  जास्तीतजास्त  पारदर्शकता आणली पाहिजे,यासाठी प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात झालेल्या विचार मंथनातून, उभय देशांच्या विचारसरणीला अनुसरून हा करार करण्यात आला.
नौदल प्रमुखांच्या या न्यूझीलंडच्या भेटीने दोन्ही नौदलाच्या सामायिक वचनबद्धतेला अधिक दृढ केले असून सखोल द्विपक्षीय सागरी गुंतवणुकीसाठी आशादायक वाढीचा मार्ग निश्चित केला आहे.
I0MK.jpeg) 
 
PQV6.jpeg)
***
S.Bedekar/S.Patgaonkar/P.Kor
*** 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1864564)
                Visitor Counter : 250