कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केन्द्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्लीतील सरदार पटेल भवन, डीएआरपीजी कार्यालय इथे भंगाराची विल्हेवाट लावणे आणि सरकारमधील प्रलंबितता कमी करणे यासह स्वच्छताकेंद्री विशेष स्वच्छता मोहीम 2.0 चा केला प्रारंभ
Posted On:
02 OCT 2022 6:18PM by PIB Mumbai
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान मंत्रालय; एमओएसपीएमओ, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री, डॉ जितेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्लीतील सरदार पटेल भवन, डीएआरपीजी कार्यालय इथे भंगाराची विल्हेवाट लावणे आणि सरकारमधील प्रलंबितता कमी करणे यासह स्वच्छताकेंद्री विशेष स्वच्छता मोहीम 2.0 चा प्रारंभ केला.
"बापूजयंती" निमित्त 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ही विशेष मोहिम सुरु केली आहे. सार्वजनिक तक्रारी, संसद सदस्यांच्या शिफारसी , राज्य सरकारे, आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत आणि संसदीय आश्वासने यांचा वेळेवर आणि प्रभावी निपटारा सुनिश्चित करणे तसेच भंगाराची विल्हेवाट लावणे हा याचा उद्देश असल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
आत्तापर्यंत केन्द्र सरकारच्या मंत्रालये/विभागांनी स्वच्छता मोहिमेसाठी 67 हजारांहून अधिक साईट्सची निवड केली आहे. या मोहिमेदरम्यान सुमारे 21 लाख प्रत्यक्ष फायली आणि 3 लाख ई-फायलींचे पुनरावलोकन करणे बाकी आहे. यंदा प्रथमच या मोहिमेत ई-फाईल्स आणि त्याचा आढावा यावरही भर दिला जाणार आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.
महिनाभर चालणाऱ्या या विशेष मोहीम 2.0 मध्ये 1.5 लाख टपाल कार्यालये, परदेशातील मोहिम/टपाल, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक कार्यालये यांना युद्धपातळीवर समाविष्ट करणे अपेक्षित आहे. विशेष मोहिमेच्या पोर्टल संदर्भात नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण डीएआरपीजीद्वारे आधीच आयोजित केले गेले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ जितेंद्र सिंह यांनी या प्रसंगी विशेष मोहीम 2.0 मार्गदर्शक तत्त्वे पुस्तिकेचे आणि ऑगस्टच्या प्रगती अहवालाचे प्रकाशन केले, तसेच निवृत्तीवेतन विभागाचे नियम सुलभ करण्यासाठी परिपत्रके जारी केली.
नंतर डॉ जितेंद्र सिंह यांनी प्रलंबित असलेल्या सर्व विविध श्रेणींचा आढावा घेतला. यात खासदारांच्या शिफारशी, पंतप्रधान कार्यालयाच्या शिफारशी, मंत्रिमंडळाच्या शिफारशी, राज्य सरकारच्या शिफारशी, सार्वजनिक तक्रारी, नियम/प्रक्रिया सुलभ करणे, पुनरावलोकनासाठी घेतलेल्या फाईल्स, स्वच्छता अभियान साइट्स यांचा समावेश होता.
डिएआरपीजीचे केंद्रीय सचिव व्ही. श्रीनिवास म्हणाले की, डिएआरपीजीने सोशल मीडिया पोस्टसाठी हॅशटॅग#स्पेशल कॅम्पेन 2.0 तयार केले आहे. विशेष मोहिमेच्या सर्व नोडल अधिकाऱ्यांना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये टॅग वापरण्याची आणि ट्विटरवर DARPG @DARPG_GOI आणि फेसबुकवर @DARPGIndia टॅग करण्याची विनंती करण्यात आली होती.
***
S.Bedekar/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864521)
Visitor Counter : 199