आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने केला 218.75कोटीचा टप्पा पार


12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 4.10 कोटीहून अधिक पहिल्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 37,444

गेल्या 24 तासांत, 3,375 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.73 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.35 टक्के

Posted On: 02 OCT 2022 11:51AM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 218.75 (2,18,75,36,041) कोटीचा टप्पा पार केला आहे.  16 मार्च 2022 पासून 12 ते  14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.10  कोटीहून (4,10,40,146) अधिक किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.

सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,15,223

2nd Dose

1,01,18,987

Precaution Dose

70,31,492

FLWs

1st Dose

1,84,36,843

2nd Dose

1,77,16,742

Precaution Dose

1,36,64,775

Age Group 12-14 years

1st Dose

4,10,40,146

2nd Dose

3,18,20,494

Age Group 15-18 years

1st Dose

6,19,49,191

2nd Dose

5,30,92,044

Age Group 18-44 years

1st Dose

56,12,92,775

2nd Dose

51,58,48,445

Precaution Dose

9,65,65,332

Age Group 45-59 years

1st Dose

20,40,33,015

2nd Dose

19,69,80,544

Precaution Dose

4,91,46,850

Over 60 years

1st Dose

12,76,71,227

2nd Dose

12,31,51,924

Precaution Dose

4,75,59,992

Precaution Dose

21,39,68,441

Total

2,18,75,36,041

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 37,444 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.08 टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.73 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 4,206 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या(कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,28,370 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत, 3,375 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत, 2,64,127 कोविड-19  चाचण्या भारतात पार पडल्या असून  एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 89.56 कोटी  (89,56,14,046) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.35 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.28 टक्के आहे.

***

S.Pophale/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1864369) Visitor Counter : 239