माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचे केले आवाहन


अहमदाबाद येथे दूरदर्शन , आकाशवाणी , पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कामकाजाचा घेतला आढावा

Posted On: 29 SEP 2022 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज अहमदाबाद येथे  दूरदर्शन, आकाशवाणी, पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोच्या कामकाजाचा आढावा घेतला. बैठकी दरम्यान ठाकूर यांनी सर्व माध्यमांना  2 ऑक्टोबरपासून पंधरा दिवस  विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यास सांगितले. यामध्ये वापरात नसलेल्या वस्तूंवर विशेष भर देण्यात आला आहे. जुने कागद तसेच  ई-कचरा काढून टाकण्यावरही  त्यांनी भर दिला.

त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सध्या सुरु असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि सामान्य लोकांना  नवीन आशय  उपलब्ध करून देण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोकांना मिळेल असे कार्यक्रम तयार करण्याबाबत  त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

या बैठकीला पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक  प्रकाश मगदूम, दूरदर्शनचे उपमहासंचालक सत्यजित दास, आकाशवाणीचे उपमहासंचालक  एन एल चौहान, दूरदर्शनचे संचालक (वृत्त)  धर्मेंद्र तिवारीआकाशवाणीच्या  प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख नवल परमार, पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोचे उपमहासंचालक योगेश पंड्या आणि  दूरदर्शनचे उपसंचालक (वृत्त) उत्सव परमार यांच्यासह या संस्थांचे विभाग प्रमुख आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1863528) Visitor Counter : 123