गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची (युएलबी) कचरा प्रक्रीया क्षमता 2014 मधील केवळ 18% वरून आताच्या 73% वर आल्याचं हरदीप एस. पुरी याचं प्रतिपादन
Posted On:
29 SEP 2022 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2022
गृह निर्माण आणि शहरी व्यवहार तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीप पुरी यांनी स्वच्छ शहर संवाद आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना सांगितलं की एसबीएम अंतर्गत केलेल्या प्रयत्नांमुळे भारतातील सर्व (100%), 4,372 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (युएलबी) उघड्यावरील शौच मुक्त (ओडीएफ) म्हणून घोषित झाल्या आहेत. आम्ही केवळ 73.45 लाख वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम केले नाही, तर दिव्यांग जनांसह लाखो शहरी गरिबांना प्रतिष्ठा आणि आरोग्य बहाल केले आहे. त्याच वेळी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची कचऱ्यावर प्रक्रीया करण्याची क्षमता 2014 मधील केवळ 18% वरून वाढवून सध्याच्या 73% वर आणली. लवकरात लवकर 100% साम्पृक्ततेवर पोहोचण्यासाठी आम्ही योजनेच्या अंमलबजावणीला गती देत आहोत.

हरदीप पुरी यांच्या हस्ते आज स्वच्छ शहर संवाद आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. गृह निर्माण आणि शहरी व्यवहार (एमओएचयुए) मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, मंत्रालयामधील वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारांचे प्रतिनिधी आणि अन्य हितधारक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
चक्राकार अर्थव्यवस्थेसाठी ‘कचऱ्यापासून संपत्ती पर्यंत’ ही संकल्पना आणि भारताला ‘कचरामुक्त भारत’ मध्ये परिवर्तित करण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न, याचे महत्व लक्षात घेऊन हरदीप पुरी यांनी नमूद केले की, “स्वच्छ भारत अभियान (शहरी) 2.0 अंतर्गत भारत स्वच्छतेच्या पुढील प्रवासाला सुरुवात करत आहे. आम्ही आता ओडीएफ भारत कडून ‘कचरा मुक्त भारत’ कडे जाण्याचे लक्ष्य ठेवत आहोत’.
मोठ्या शहरांमध्ये बायो-मिथेनेशन प्लांट आणि कचऱ्यापासून ऊर्जा (वेस्ट टू एनर्जी) प्लांट लावले जात आहेत, असे ते म्हणाले.
S.Kane /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1863469)
अभ्यागत कक्ष : 229