युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अहमदाबाद येथे होणार्या भव्य समारंभात 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करणार
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                28 SEP 2022 7:20PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2022
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये आयोजित भव्य समारंभात 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करतील. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या देशभरातील खेळाडूंना पंतप्रधान यावेळी संबोधित करतील. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि अन्य मान्यवर या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
गुजरात मध्ये प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022 या काळात आयोजित करण्यात आल्या आहेत. देशभरातील एकूण अंदाजे 15000 खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी विविध प्रकारच्या 36 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार असून, त्यामुळे या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्पर्धा ठरणार आहेत. अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने आंतरराष्ट्रीय दर्जाची मजबूत क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण करायला सुरुवात केली , ज्यामुळे राज्याला अतिशय कमी कालावधीत स्पर्धेची तयारी करायला मदत झाली.  
 
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1863109)
                Visitor Counter : 272