वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

औद्योगिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभाग (DPIIT), इन्व्हेस्ट इंडिया आणि नेदरलँड्सचा दूतावास यांच्या संयुक्त सहकार्याने भारत-नेदरलँड्स फास्ट-ट्रॅक मेकॅनिझम (FTM) याची औपचारिक स्थापना.

Posted On: 28 SEP 2022 11:46AM by PIB Mumbai

औद्योगिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) आणि नेदरलँड्सच्या दूतावास यांच्या संयुक्त सहकार्याने भारत आणि नेदरलँड्समधील द्विपक्षीय जलदगती मंच (फास्ट-ट्रॅक मेकॅनिझम FTM) औपचारिक करण्यासाठी असलेल्या संयुक्त निवेदनावर अधिकृतपणे स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.इन्व्हेस्ट इंडिया,राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा एजन्सी, ही या द्विपक्षीय मंचाची (FTM) अंमलबजावणी करणारी संस्था आहे.

नेदरलँडचे भारतातील राजदूत महामहीम मार्टेन व्हॅन डेन बर्ग आणि डीपीआयआयटीचे (DPIIT) सचिव,श्री अनुराग जैन यांनी 27 सप्टेंबर 2022 रोजी या संयुक्त निवेदनावर औपचारिकपणे स्वाक्षरी केली आणि कागदपत्रांचे आदानप्रदान केले.

भारत आणि नेदरलँड यांच्यातील द्विपक्षीय मंचाचा (FTM) उद्देश भारतात कार्यरत असलेल्या डच कंपन्यांच्या गुंतवणूकांचे जलद निराकरण करण्यासाठी एक सुयोग्य व्यासपीठ म्हणून काम करणे हा आहे.ही यंत्रणा डीपीआयआयटी, संबंधित मंत्रालये आणि विभाग, इन्व्हेस्ट इंडिया आणि नेदरलँड्सचा दूतावास यांच्यातील सहकार्य दृढ करण्यासाठी कार्य करेल.ही यंत्रणा परस्पर गुंतवणुकीच्या योजना वाढवण्याच्या द्विपक्षीय प्रयत्नांना बळकट करेल आणि सहकार्य करेल, तसेच दोन्ही देशांमधील कंपन्यांच्या व्यावसायिक सहकार्याला समर्थन देऊन विकसित करेल.

भारत आणि नेदरलँड यांच्यातील राजनैतिक संबंध औपचारिकपणे 1947 मध्येच प्रस्थापित झालेले आहेत. तेव्हापासून, दोन्ही देशांनी एकमेकांच्यात  दृढ राजकीय, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आणि विविध क्षेत्रांत सहकार्य विकसित केले आहेत.

अधिकृत भारतीय आकडेवारीनुसार, नेदरलँड हा भारतात गुंतवणूक करणारा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणूकदार आहे.  एप्रिल 2000 ते जून 2022 दरम्यान, नेदरलँड्समधून भारतात झालेली थेट परकीय गुंतवणुक  सुमारे 42.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती.

2021-2022 मध्ये, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 17 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका झाला होता.प्रामुख्याने खनिज इंधन आणि खनिज-आधारित उत्पादने, सेंद्रिय रसायने, इलेक्ट्रिकल मशिनरी आणि उपकरणे, ॲल्युमिनियम, लोह आणि पोलाद आणि औषध उत्पादने यांचा समावेश नेदरलँड्सला  भारतातून होणाऱ्या निर्यातीत होतो.


 ***

Gopal C/Sampada/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1862888) Visitor Counter : 205


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu