कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इंडोनेशियातील बाली येथे दाखल
तोमर यांनी ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या मंत्र्यांबरोबर झालेल्या द्विपक्षीय बैठकीत मंत्र्यांना दिले भारत भेटीचे निमंत्रण
Posted On:
27 SEP 2022 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कृषी मंत्रालयाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळासह तीन दिवसीय दौऱ्यावर आज इंडोनेशियातील बालीमध्ये दाखल झाले. तोमर यांनी बाली येथे कॅनडाच्या कृषी आणि कृषी-अन्न मंत्री मेरी क्लॉड बिब्यू आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि उत्पादन उपमंत्री टिम आयरेस यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय बैठका घेतल्या.


या द्विपक्षीय बैठकींमध्ये तोमर यांनी दोन्ही मंत्र्यांना पुढील वर्षी भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या G-20 कृषी शिखर परिषदेसाठी निमंत्रण दिले. याशिवाय, भारतीय देखरेखीखाली साजऱ्या होणार्या भरड धान्य आंतरराष्ट्रीय वर्ष - 2023 साठी समर्थन देण्याचे आवाहन तोमर यांनी या दोन्ही नेत्यांना केले. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या मंत्र्यांनी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन तोमर यांना दिले.
R.Aghor /S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862720)
Visitor Counter : 220