शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 13 व्या FICCI जागतिक कौशल्य शिखर परिषद 2022 चे केले उद्‌घाटन


या वर्षीच्या शिखर परिषदेची मुख्य संकल्पना होती " शिक्षण ते रोजगार – संकल्पना वास्तवात उतरवणे"

Posted On: 27 SEP 2022 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2022

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत शिक्षण ते रोजगार – संकल्पना वास्तवात उतरवणे या संकल्पनेवर आधारित 13 व्या FICCI जागतिक कौशल्य शिखर परिषद 2022 चे उद्घाटन केले तसेच उद्घाटन सत्राला संबोधित केले.

धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळविण्यासाठी आणि भारताची कौशल्य व्यवस्था अधिक उर्जावान बनवण्यासाठी कौशल्यांचा लाभ घेण्याबाबत आपले विचार मांडले.

आपल्या एकूण लोकसंख्येपैकी कामकरी वर्गाचे प्रमाण मोठे असण्याचे वरदान देशाला लाभले आहे. देशाचे कार्यबल असणाऱ्या या वर्गाचे परिवर्तनात्मक शक्तीत रूपांतर करण्यात शिक्षण आणि कौशल्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात असे मत त्यांनी व्यक्त केले.

देशाची अर्थव्यवस्था अधिक उत्पादक आणि जोमदार होण्यासाठी आपण आपले कार्यबल अधिक उत्पादनक्षम बनवले पाहिजे. कामगार कायद्यांचे सुलभीकरण आणि शिकाऊ प्रशिक्षण यासारख्या उपक्रमांमुळे ही कार्यशक्ती अधिक जोमदार बनवण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

शिक्षण आणि कौशल्य व्यवस्था अधिक उर्जावान बनवण्यासाठी, शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट ते आगामी डिजिटल विद्यापीठापर्यंत अनेक उपक्रम आणि धोरणात्मक सुधारणा सरकार हाती घेत आहे, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.

देशात एक मजबूत शैक्षणिक- उद्योग- धोरण निर्माते यांच्यात संपर्कव्यवस्था तयार करण्याचे तसेच शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात अधिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामूहिक दृष्टिकोनाने काम करण्याचे आवाहन धर्मेंद्र प्रधान यांनी केले.

 

R.Aghor /S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1862709) Visitor Counter : 163


Read this release in: English , Urdu , Hindi